नागपूर :- डॉ. हेडगेवार रकतपेढीच्या सभागृहात नुकताच संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलतांना रा.तु.म. नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर म्हणाल्या की सन्मित्र सभेचे सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील गेल्या ५५ वर्षातील कार्य खरोखरच स्पृहणीय आहे. त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण उपक्रमात सन्मित्र सभेच्या भविष्यातील सहकार्याची शक्यता याप्रसंगी व्यक्त केली. डॉ. मनाली क्षीरसागर यांचा सन्मित्र सभेतर्फे याप्रसंगी शाल आणि श्रीफळ देऊन हृद्य सत्कार करण्यात आला. सन्मित्र सभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनिल शेंडे यांनी आपल्या प्रस्तविकात सन्मित्र सभेच्या ५५ वर्षातील दैदीप्यमान वाटचाल आणि अनेकविध उपलब्धिंवर ओज्वस्वी शब्दात प्रकाश टाकला आणि भविष्यातील योजना आणि उपक्रम यांचे सुतोवाच याप्रसंगी केले. नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या सदस्यांचे त्यांनी स्वागत केले.
कार्यकारिणीत उपाध्यक्ष विनोद जोशी, सचिव-डॉ. वृषाली शिलेदार, कोषाध्यक्ष -विनोद देशमुख, सहसचिव – प्रवीण मुळे, सहसचिव -गजानन देशपांडे, आणि कार्यकारिणी सदस्य म्हणून, अशोक पत्की, माधवी भूत, ऍड. सचिन नारळे, महेश वाबगावकर, शिव शाहू, अरुण केदार, जयदेव धांडे, आणि सहभागी सदस्य उज्वला अंधारे यांचा समावेश आहे. यानंतर सन्मित्र सभेचे नवे सदस्य डॉ. स्मिता आणि सुधीर होटे, विजय लिमये, आणि अजय कस्तुरे यांचे स्वागत राजन भूत यांच्या हस्ते करण्यात आले. मावळते अध्यक्ष राजन भूत यांनी नवे अध्यक्ष आणि नव्या कार्यकारिणीला आपल्या शुभेच्छा दिल्या आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन याप्रसंगी दिले. कार्यक्रमाची सुरवात ऍड. विवेक पळशीकर यांनी म्हटलेल्या सन्मित्र प्रार्थनेने झाली. यानंतर त्यांनीच लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरचित टिळक – स्तवन सादर केले. संपूर्ण वंदे -मातरम च्या सामूहिक गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वला अंधारे यांनी केले. कार्यक्रमाला हेमंत भगत, राम माताडे, रत्नाकर केकतपुरे, अनिल शास्त्री, मनोहर शिनखेडे, चार्टर्ड अकौंटन्ट सुनिल चोखारे आणि अनिल लांजेवार, आदि अनेक गणमान्य उपस्थित होते.





