spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पूर्व विदर्भातून काँग्रेसच्या ‘मंडल यात्रा’ला ७ ऑगस्टपासून प्रारंभ

नागपूर :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागातर्फे “हर एक ओबीसी बनेगा काँग्रेसी” या घोषवाक्यासह आयोजित राज्यव्यापी ‘मंडल यात्रा’ पूर्व विदर्भात ७ ते ११ ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात आला आहेत. या यात्रेचा शुभारंभ ७ ऑगस्ट रोजी, सकाळी १० वाजता. नागपूरच्या संविधान चौकातून होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही यात्रा नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या सहा जिल्ह्यांतील ६३ तालुके, ३२ विधानसभा व ६ लोकसभा मतदारसंघांमधून प्रवास करणार आहे. यात्रेदरम्यान जनसंवाद, कार्यकर्ता मेळावे, पत्रकार परिषद, संविधान जनजागृती कार्यक्रम आणि जाहीर सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. जातनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षणाचे संरक्षण, सामाजिक न्याय, संविधानिक हक्क आणि राजकीय प्रतिनिधित्व या विषयांवर जनजागृती करण्यावर यात्रेचा भर राहणार असून, काँग्रेसचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि हजारो कार्यकर्ते यात सहभागी होणार आहेत. यावेळी पत्रपरिषदेला गिरीश पांडव, अतुल लोंढे, अजय हटेवार, मोरेश्वर भादे, प्रा. अवंतिका लेकुरवाळे, भूषण तल्हार, प्रशांत आस्कर, प्रशांत पवार, रमेश कारामोरे, उमाकांत धांडे, मनोज ढोरे, श्रीकांत येरपुडे, जीवन कावळे यांच्यासह प्रदेश व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

Popular Articles