spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

माळी महासंघ, नागपूरतर्फे १४० गुणवंत विद्यार्थी व ३६ नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा भव्य गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

नागपूर :- माळी महासंघ, नागपूर शहर व ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील १४० गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा तसेच नुकत्याच निवडून आलेल्या ३६ नगरसेवकांचा भव्य गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यास समाजबांधव, पालक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुकुंद पोटदुखे यांनी प्रास्ताविकातून गुणगौरव सोहळ्याचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन रचना कनेर व विजया अंबाडकर यांनी केले. सोहळ्याचे उद्घाटन अतिरिक्त मुख्याधिकारी, जिल्हा परिषद नागपूर कमलकिशोर फुटाणे यांच्या हस्ते झाले. उद्घाटनपर भाषणात त्यांनी गुणवंत विद्यार्थी व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रमुख मार्गदर्शक तथा वनामतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती योजनांची सविस्तर माहिती देत विद्यार्थी आणि युवकांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले. महानगरपालिका नागपूरच्या शिक्षण विभागाच्या उपयुक्त डॉ. मेघना वासनकर यांनी एमपीएससी स्पर्धा परीक्षांबाबत सखोल मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखविला. माळी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे यांनी समाजाची संघटना अधिक सक्षम व प्रभावी करण्यासाठी सर्व समाजबांधवांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात माळी महासंघाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी माळी समाजाची ऑनलाइन जनगणना सुरू करण्यात येत असल्याची घोषणा केली.

समाजाची अचूक माहिती संकलित करण्यासाठी प्रत्येक समाजबांधवाने या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. नागपूर शहराध्यक्ष शंकर चौधरी यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पालक, विद्यार्थी, समाजबांधव, पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकाऱ्यांचे आभार मानले. माळी महासंघाचे राष्ट्रीय सचिव रविंद्र अंबाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित हा गुणगौरव सोहळा समाजातील गुणवंतांचा सन्मान, नव्या पिढीला प्रेरणा आणि समाजसंघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने अत्यंत यशस्वी ठरला.

यावेळी माळी महासंघाचे नानासाहेब कांडळकर, गोविंदराव वैराळे, मधुसूदन देशमुख, शामराव नागफासे, हिरालाल कावरे, ओमप्रकाश कुशवाह, राजेंद्र वाट तसेच नगरसेविका  ज्योती देवघरे, नगरसेवक विजय होले, नगराध्यक्ष दर्शना ढोरे, माधव चर्जन, सुरेशराव खसारे, सुरेश चीचमलकर, प्रकाश वरुडकर, इमेश्वर यावलकर आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण अध्यक्ष प्रमोद हत्ती, बाळकृष्ण येनकर तसेच प्रदीप सोनुले, राहुल पलाडे, संजय बोबडे, राधेश्याम खवले, कपिलराव उमाळे, राजू गाडगे, अजय शिंगरे, प्रदीप दहिकर, मिलिंद भोंगाडे, सचिन हिवसे, डॉ. राजेश कुराडे, सचिन सातपुते, धनराज फरकाडे, नंदूभाऊ कनेर, नंदा भोयर, रवी जोगे, गोविंदराव ठाकरे, मुंगळे, रामदास वाघे, सिंधू कांडळकर, सौरभ निमकर, आशा भोकरे, नयना गाडगे, सुनंदा नाले, संजय सावरकर, मंगला ठाकरे, रोशन बनकर, अर्चना तिजारे, अंजली अंबाडकर, मंजुषा ठाकरे, अरुणा वाघे, मनीषा पलाडे, प्रणिता लोखंडे, मालिनी भोयर, अर्चना भोंगाडे, छाया टाकरखेडे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवर, समाजबांधव, पालक, विद्यार्थी, पत्रकार बंधू, स्वयंसेवक आणि सर्व सहकाऱ्यांचे माळी महासंघातर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.