spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी आधार प्रमाणिकरण करा

– जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आवाहन

–  जिल्हाधिकाऱ्यांची बँक अधिकाऱ्यांसोबत बैठक

यवतमाळ :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ या योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दि. ३० जुलै २०२६ रोजी सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली या सभेमध्ये जिल्हा उपनिबंधक, सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे जिल्हा समन्वयक, शाखा व्यवस्थापक, सहाय्यक निबंधक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सर्व बँकांना योजनेच्या याद्या प्रसिध्द करण्यात आल्या असुन या यादीत नाव आलेल्या लाभार्थ्यांना तात्काळ आधार प्रमाणिकरण करुन घेण्याबाबत बँक शाखा स्तरावरुन सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्याच्य सूचना दिल्या. याकरीता दवंडी देण्यात यावी. सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांना यादी उपलब्ध करुन देऊन या कामी त्यांची मदत घेण्यात यावी. शेतकऱ्यांना दुरध्वनी वरुन संपर्क करावा, बँक शाखेत कर्जमाफीबाबत आलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेविषयी मार्गदशन करावे.

बँकेत आलेल्या शेतकऱ्यांना सौजन्याची वागणूक देण्यात यावी. ज्या शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीत आलेली नाही. त्यांची नावे यानंतरच्या प्रसिध्द होणाऱ्या यादीमध्ये येणार आहे. योजनेच्या पोर्टलवर प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तालुका स्तरावर तालुकास्तरीय समिती तसेच जिल्हा स्तरावर जिल्हास्तरीय समिती असून या समितीमार्फत शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना अर्ज करुन सुध्दा त्यांच्या तक्रारींचे निवारण करता येणार आहे.

सर्व अधिकारी, बँक शाखा अधिकारी यांनी कर्जमुक्ती योजनेचे काम सजग राहून करावे. याबाबत कोणत्याही शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची सर्वांनी दक्षता घेण्याबाबत सूचना देण्सात आल्या.

शेतकऱ्यांकरीता सेतु सुविधा केंद्रावर आधार प्रमाणिकरणाची सुविधा विनामुल्य आहे. याबाबतचे निर्देश सर्व सेतु सुविधा केंद्र चालकांना देण्यात आलेले आहेत.

ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले आहे. अशा शेतकऱ्यांचे कर्जखात्यात कर्जमुक्ती लाभाची रक्कम लवकरच शासनामार्फत जमा करण्यात येणार आहे.

या कर्जमुक्ती योजनेमध्ये पात्र असलेल्या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचे यादीतआपले नाव पाहून नाव आलेल्या सर्व शेतकऱ्यांनी त्वरीत जवळचे सेतु सुविधा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करावे व कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.

Popular Articles