नागपूर :- ग्लोबल एलिट मीडिया अँड टेक्नॉलॉजी या संस्थेच्या वतीने दिनांक दोन ऑगस्ट 2026 रोजी नॅशनल आयडियल टीचर अवार्ड 2026 कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे आमदार विकास ठाकरे पश्चिम नागपूर विधानसभा, ग्रुप कॅप्टन विजय हरदास रिटायर्ड इंडियन एअर फोर्स कारगिल युद्धात भाग घेतलेले कॅप्टन , फ्लाईट लेफ्टनंट करुणा हरदास फर्स्ट वूमन अकाउंट ऑफिसर इंडियन एअर फोर्स. महेश मानकर ,मानकर ग्रुप चे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, जफार अहमद खान प्रेसिडेंट स्कूल हेडमास्टर्स चॅरिटेबल असोसिएशन नागपूर हे उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉ. पुष्पा सुभाष तायडे यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल महेश मानकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले डॉ. पुष्पा सुभाष तायडे ह्या लोक महाविद्यालय वर्धा च्या माजी प्राचार्य असून दत्ता मेघे मेडिकल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे लिबरल आर्ट आणि ह्युमॅनिटीज डिपार्टमेंटच्या डीन म्हणून कार्य करीत आहे. त्यांनी एकूण 34 वर्षे शैक्षणिक क्षेत्रात काम केले असून सतरा वर्षे प्राध्यापक व 17 वर्षे प्राचार्य म्हणून काम करण्याचा त्यांचा अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ विद्यार्थ्यांना पीएच.डी प्राप्त झालेली असून 11 विद्यार्थी एम फिल व 13 विद्यार्थी एमबीए झालेले आहेत. त्यांची 14 पुस्तके प्रकाशित झालेली असून 16 पुस्तकाचे संपादन त्यांनी केलेले आहे. त्यांचे चाळीस रिसर्च पेपर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झालेले असून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. ग्लोबल एलिट मीडिया अँड टेक्नॉलॉजी या संस्थेच्या वतीने त्यांना आयडियल टीचर अवार्ड ने सन्मानित करण्यात आले. या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.








