– अंत्यसंस्कारापूर्वी गळ्यावर जखम आढळल्याने महिलेच्या मृत्यूभोवती गूढ; घातपाताचा संशय
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रमानगर रेल्वे फाटकाजवळ कुजलेल्या अवस्थेत एका इसमाचा मृतदेह सापडल्याच्या घटनेची चर्चा थांबत नाही, तोच अवघ्या काही तासांत कामठी शहरात आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. आंबेडकर नगर येथे राहत्या घरात दोन दिवसांपासून मृतावस्थेत पडून असलेल्या ५५ वर्षीय महिलेच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच तिच्या गळ्यावर संशयास्पद जखम आढळल्याने एकच खळबळ उडाली. नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने मृतदेह तातडीने शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, संपूर्ण प्रकरण आता पोलिस तपासाच्या केंद्रस्थानी आले आहे.
मृत महिलेचे नाव कविता तुळशीराम मुळेवार (वय ५५, रा. आंबेडकर नगर, कामठी) अशी आहे. नैसर्गिकरित्या अकस्मात मृत्यु झाल्याचा समज घालून अंत्येष्टी ची तयारी करीत अंत्यसंस्कार करण्याच्या बेतात सर्व नातेवाईक मृतकेच्या घरी पोहोचून मृतकेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आजनी मोक्षधाम येथे नेण्यासाठी तयारी करीत असतानाच मृतकेच्या गळ्यावर चिरा आढळल्याने मृतदेह घाटावर नेण्याऐवजी पोलिसांच्या उपस्थितीत श्वविच्छेदनगृहात नेण्यात आले तर अंत्येष्टी साठी आलेले नातेवाईक उलटपायी परतले असले तरी आज होणाऱ्या शवविच्छेदन अहवाला नंतरच मृत्यूचे गूढ रहस्य उलगडेल की मृत्यू अकस्मात आहे की घातपात? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक महिला कविता ह्या शनिवारी घराबाहेर पडल्याचं नाही तर रविवारी दुपारी चार च्या जवळपास नळाला पाणी आला असता नळाचे पाणी भरन्यासाठी शेजारी बोलवायला गेले असता दार आतून बंद होते व बोलावण् याचा प्रतिउत्तरात कुठलाही प्रतिसाद येत नव्हता यावर संशय बळकावत शेजाऱ्यानी मुख्य दार आतून बंद असल्याने घरा मागील दारातून आत मध्ये प्रवेश केला असता चक्क जमिनीवर सदर महिला मृतावस्थेत आढळल्याने सर्वांना एकच धक्का बसला ?मृत्यूचे कारण कळू शकले नाही मात्र अकस्मात नैसर्गिक मृत्यू झाल्याचे समज गृहीत धरून पुढील अंत्यसंस्कार कार्यक्रम करणे,नातेवाईकाना बोलावणे यावर उशीर होईल यासाठी मृतदेहाची अवहेलना न व्हावी यासाठी मृतदेह फ्रिजर मध्ये ठेवण्यात आले.दोन दिवसांचा मृत्यू झाल्यामुळे दुर्गंधी पसरत होती एकीकडे सोमवारी दुपारी 3 वाजता अंत्यसंस्काराची तयारी करीत असताना सर्व नातेवाईक,शेजारी अंत्यसंस्कार करण्यासाठी घाटावर जाण्यासाठी आले असता मृतक महिलेच्या पार्थिवावर आंघोळ करून देत असताना गळयावर असलेला चिरा बघून संशय बळावला व हा अकस्मात मृत्यू नसून घातपात आहे असा संशय व्यक्त करून पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थकाचा पंचनामा करून मृतदेह थेट शवविच्छेदन गृहात हलविले तर तर घाटावर नेणारा मृतदेह थेट श्वविच्छेदनगृहात पोहोचल्याने अंतयेष्टीसाठी आलेले नातेवाईक व शेजारी उलटपायी स्वगृही परतले तर आज येणाऱ्या शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे गूढ रहस्य उलगडणार !





