नागपूर :- मराठवाडा विद्यापीठ नामंतर आंदोलन हे लोकशाहीचा हिताचे होते ते आणीबाणी पेक्षा हि खतरनाक होते वर्तमान शासनाने मिसा कायद्यानुसार जेल मधे असलेलांना पेंशन देण्याचे ठरविले मग त्याच धर्तीवर लोकशाहीचा अस्मिते साठी सोळा वर्ष संघर्ष करणार्या भीम सैनिकांना शासनाने पेंशन घोषित करून त्यांच्या सन्मान करावे असे आवाहन आंरिमोचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले ते नामंतर शहिद भिम सैनिक दिनानिमित्त ईंदौरा दहा नंबर पुल येथील शहिद स्मारक येथे मानवंदना कार्यक्रमात बोलत होते. प्रथम डाॅ सुधा जनबंधू यांनी दीपप्रज्वलन केले दामु दादा कावरे. प्रविण आवळे, प्रा.रमेश दुपारे, चरणदास गायकवाड, राजु कांबळे, जयदेव चिंवडे , वैशाली तभाने, नरेश खनः रमेश दुपारे, विद्यानंद गांवडे, व मोठ्या संख्येने महिला पुरूष कार्यकर्ते उपस्थित होते.








