spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सुख शांती समाधान संस्थेतर्फे कोराडीत गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिभावात संपन्न

नागपूर :- सुख शांती समाधान संस्था, नागपूर यांच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त रविवारी (२ ऑगस्ट) ला कोराडी येथील देवी मंदिर परिसरातील अखंड दीपज्योती भवन येथे भक्तिमय वातावरणात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमास सुमारे १,३०० शिबिरार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व योगगुरू सचिन माथूरकर यांच्या शुभ आगमनाने झाली. श्री छत्र लेझीम पथकाच्या तालावर त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. पुष्पवृष्टी करत त्यांना मंचापर्यंत नेण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित शिबिरार्थ्यांनी सामूहिकरीत्या गायत्री मंत्राचे उच्चारण करून गुरुमाऊलींचे स्थानापन्न केले. गुरुवंदना, वर्किंग टीमचे सादरीकरण आणि विधिवत पूजन संपन्न झाले. पूजेचा मान नीलिमा राजेश मस्के या दांपत्यास लाभला. योगगुरू सचिन माथूरकर यांनी गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र जप, सात चक्रांवर ओंकार साधना तसेच बासरीच्या सुरेल धूनवर ध्यानसाधना घेतली. या साधनेमुळे संपूर्ण परिसर ओंकारमय व शांततामय वातावरणाने भारावून गेला. यावेळी मनीषा कोरडे यांनी भक्तिगीत सादर केले. अर्चना सुरुशे व तृप्ती यांनी गुरुतत्त्वावर विचार व्यक्त केले. संस्थेच्या वर्किंग टीममधील महिलांनी योगनृत्य सादर करून गुरूंच्या चरणी आपली भावपूर्ण श्रद्धा व्यक्त केली. तसेच नांदा ग्रुपनेही योगनृत्य व विविध कलाविष्कार सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमा दरम्यान प्रोजेक्ट डायरेक्टर अर्चना सुरुशे, नीलिमा देशपांडे व महेश जोशी यांचा योगगुरू सचिन माथूरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुनील पोद्दार व त्यांच्या टीमने विश्वशांतीचा संदेश देणारे शांतीगीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता शाहू यांनी केले तर नीलिमा देशपांडे यांनी आभार मानले सर्व शिबिरार्थींनी आपल्या- आपल्या गटानुसार गुरूंचे दर्शन व पूजन केले. महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. संस्थेच्या सचिव शीला केळापूरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.