spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

EPFO : पीएफच्या सेवा आज 5 तासांसाठी राहणार बंद!

EPFO: तुम्हाला पीएफ अकाउंटशी संबंधित कोणतंही काम करायचं असेल तर महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही आज काही महत्त्वाचं काम करणार असाल तर तुम्हाला तुमचा प्लॅन बदलावा लागूशकतो. ईपीएफओने आपल्या कोट्यवधी सब्सक्रायबर्सला अटर्ट करत एक महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. संघटनेने सांगितलं की, 5 ऑगस्ट 2026 ला त्यांच्या ई-ऑफिस अ‍ॅप्लिकेशनच्या सेवा अस्थायीरित्या बंद राहतील. याचा अर्थ असा आहे की, ठरलेल्या वेळेत तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करू शकणार नाहीत.

ई-ऑफिस अ‍ॅप या काळात पूर्णपणे बंद राहणार

ईपीएफओद्वारे 3 ऑगस्ट 2026 ला जारी केलेल्या अधिकृत विधानानुसार, बुधवारी म्हणजेच आज 5 ऑगस्ट 2026 रोजी ई-ऑफिसच्या सेवा पूर्णपणे ठप्प राहतील.

अचूक वेळ कोणती आहे हे जाणून घ्यायचं झाल्यास, संध्याकाळी 6 वाजेपासून सुरू होऊन रात्री 9.30 वाजेपर्यंत जारी राहील. या साडे तीन तासांच्या विंडोमध्ये सब्सक्राइबर्स ई-ऑफिस अ‍ॅप अजिबात अ‍ॅक्सेस करू शकणार नाहीत. यामुळे तुमचं एखादं महत्त्वाचं काम पेडिंग असेल, तर त्रास टाळण्यासाठी तुम्ही या वेळेपूर्वी ते काम करून घ्यावं.

सिस्टम अपग्रेडशी संबंधित टेक्निकल कारण

या सेवा मध्येच का रोखल्या जात आहेत? खरंतर ईपीएफओ आपल्या डिजिटल सेवांना जास्त आधुनिक बनवण्याच्या दिशेने काम करत आहे. ही अस्थायी अडचण सिस्टम अपग्रेडेशनचा भाग आहे. नॅशनल इंफॉर्मेटिक्स सेंटरची ई-ऑफिस टीम या रिकाम्या वेळेचा वापर प्लॅटफॉर्मच्या अनेक महत्त्वाच्या भागांना अपडेट करण्यासाठी करेल. या प्रोसेसमध्ये ई-फाइल, पोर्टल, एमआयएस आणि एमडीएमचे नवे व्हर्जन इंस्टॉल केले जातील. या टेक्निकल बदलाचा मुख्य उद्देश येत्या काळात लोकांना जास्त सुरक्षित, वेगवान आणि विश्वासार्ह सर्व्हिस देणे आहे.

पीएफ क्लेम पास होण्यास लागू शकतो जास्त वेळ

तुम्हाला लक्षात असेल की, यापूर्वी जूनच्या अखेरच्या आठवड्यातही ईपीएफओने एम्प्लॉयर पोर्टल आणि उमंग अ‍ॅपवर एक मोठा डेटाबेस मायग्रेशन केलं होतं. ईपीएफओने आता ते आवश्यक सॉफ्टवेयर अपग्रेड करण्याचं काम यशस्वीरित्या पूर्ण केलंय. खरंतर, नवीन व्यवस्थेअंतर्गत सेवांना हळुहळू लाइव्ह केलं जातंय. ईपीएफओने स्पष्ट केलंय की, सिस्टम मायग्रेशननंतर क्लेम आणि सर्व्हिस रिक्वेस्ट अतिरिक्त चार्जसह पास केलं जाईल. जेणेकरून कोणतीही चूक होणार नाही. यामुळे, पुढील काही दिवसांत पीएफ क्लेमच्या निपटारा प्रोसेसमध्ये नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ लागू शकतो. यासोबतच, गर्दीच्या वेळी (पीक अवर्समध्ये) पोर्टलवर वारंवार लॉग-इन करणं टाळा, असं आवाहनही संस्थेने केलंय.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.