spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सिद्धिविनायक मंदिरातील घोटाळा प्रकरणी शिंदेंकडून चौकशीचे आदेश

मुंबई :- मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळा प्रकरणात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिरात गेल्या पाच वर्षांत प्राप्त झालेल्या रोख देणग्या, दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तूंचे विशेष लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याचे आदेश दिले आहेत. मंदिरात आलेल्या देणग्यांची नोंद, आर्थिक व्यवहार, दागिन्यांचा हिशेब आणि त्यांच्या व्यवस्थापनाची सखोल तपासणी या ऑडिटद्वारे केली जाणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, या लेखापरीक्षणाचा अहवाल आल्यानंतर संबंधित बाबींवर पुढील निर्णय घेतला जाणार असून, अनियमितता आढळल्यास संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी काल (4 ऑगस्ट) एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिरातच्या चौकशीचे निर्देश दिले आहे.

दरम्यान, श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी काल (मंगळवार) मंत्रायलात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. जवळ जवळ 20 मिनटे या दोघांची भेटीदरम्यान चर्चा झाली. या भेटीनंतर मंदिरातील कथित देणगी घोटाळा प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्त यांना या संदर्भात आदेश देण्यात आले आहे. मंदिरात गेल्या पाच वर्षांत प्राप्त झालेल्या रोख देणग्या, दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तूंचे विशेष लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याचे आदेश दिले आहेत. यात मंदिराच्या आर्थिक व्यवहार आणि व्यवस्थापनाची सखोल चौकशी होणार आहे. तसेच यात गैरप्रकार आणि अनियमितता आढळ्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असं सूत्र सांगतायत. पाच वर्षातील देणग्या आणि मौल्यवान वस्तूंचे यामध्ये ऑडिट होणार आहे. अतिरिक्त मुख्य सचिव यांना या संदर्भात अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.