spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले शाळेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार

पंकज परशुरामकर,नवेगावबांध :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सावित्रीबाई फुले ज्ञानपीठ प्राथमिक शाळा, बोंडे (नवेगावबांध) येथील विद्यार्थ्यांचा गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शाळेत विशेष सत्कार करण्यात आला.

यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत विवेक लिलेश झोडे आणि आर्यन जीवन राऊत या विद्यार्थ्यांनी यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. त्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र पत्रकार संघ, गोंदिया जिल्हाध्यक्ष सतीश कोसरकर, सुरेश काशिवार, विनोद डोंगरवार, हेमलता राऊत, सहाय्यक अध्यापिका ज्योती कापगते, जना  कापगते, मुख्याध्यापक श्रीचंद इंदुलकर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच इतर विद्यार्थ्यांनीही सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर शिष्यवृत्तीसह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवावे, असे आवाहन करून त्यांना प्रेरित केले. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Popular Articles