spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर

मुंबई :- भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी व प्रभारी आणि प्रदेश महामंत्री आ. योगेश सागर यांनी अनुसूचित जमाती मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. उपाध्यक्षपदी नागपूर जिल्ह्यातील विरेंद्रशहा उइके, सुदर्शन शिंदे (हिंगोली), अशोक इरनाक (ठाणे), डॉ. सुप्रिया गावित (नंदुरबार) आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सरचिटणीसपदी नाशिकचे एन.डी. गावित, गणेश इंगळे (जालना), आकाश मडावी (नागपूर) आदींची तर प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून ज्ञानेश्वर भोसले (सोलापूर), केवल झामरकर (अमरावती), गिरीष चव्हाण (अहिल्यानगर) आदींचा समावेश आहे. कोषाध्यक्षपदी विवेक नागभिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Popular Articles