spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महापौरसह शिष्टमंडळाने घेतली महापौरांची सदिच्छा भेट

– शहरातील विविध विकासकामांसह भांडेवाडीतील प्रकल्पांची माहिती जाणून घेतली

नागपूर :- वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने नागपूर महानगरपालिकेच्या महापौर निता ठाकरे यांची मनपा मुख्यालयातील महापौर सभाकक्षात सदिच्छा भेट घेतली. यावेळी मनपाद्वारे शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तत्पूर्वी शिष्टमंडळाने भांडेवाडी येथील भूमी ग्रीन एनर्जी एन्व्हायरोकेअर एलएलपी कंपनीच्या घनकचरा कचरा प्रक्रिया केंद्राला भेट देत प्रकल्पाची माहिती जाणून घेतली.

सदिच्छा भेटीदरम्यान मनपाच्या स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र(बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त  मुरुगानंथम एम., वसई विरार शहर महानगरपालिकेचे उपमहापौर मार्शल लोपीस, स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी, सभागृहनेते प्रफुल्ल साने, विरोधीपक्ष नेते मनोज पाटील, आरोग्य समिती सभापती निलेश देशमुख, गटनेता अशोक शेळके, नारायण मानकर, निशाद चोरघे,  राजेश नाईक, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, सहायक आयुक्त जितेंद्र नाईक, एआयआयएलएसजी सल्लागार  श्रुतीसागर पाटील, कनिष्ठ अभियंता सचिन तांडेल, मनपाच्या आरोग्य विशेष समिती सभापती मनिषा अतकरे, ज्येष्ठ नगरसेवक सुधीर (बंडू) राऊत, विजय (पिंटू) झलके यांच्यासह उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त /राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेद्वारे सुरू असलेल्या शहरातील विविध प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील यांच्या अध्यक्षतेत शिष्टमंडळ नागपुरात दाखल झाले. यावेळी त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या महापौर निता ठाकरे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. तसेच महापौर अजीव पाटील यांनी शहरातील विकास कामांबद्दल मनपा प्रशासनाचे कौतुक केले. तसेच भांडेवाडी डम्पिंग यार्ड परिसरातील दहा एकर जागेवर असलेल्या भूमी ग्रीन एनर्जी एन्व्हायरोकेअर एलएलपी कंपनीच्या घनकचरा कचरा प्रक्रिया केंद्राला भेट देत प्रक्रियेचे संपूर्ण माहिती जाणून घेतली. पुणे येथील भूमी ग्रीन एनर्जी एन्व्हायरोकेअर एलएलपी कंपनीच्या प्रक्रिया केल्या जाणाऱ्या कचऱ्यातून सेंद्रिय खत निर्मिती व आरडीएफ तयार केले जात असून, याबद्दल महापौर पाटील यांनी संपूर्ण माहिती जाणून घेत शहरातील घनकचरा व्यवस्थापनाविषयी चर्चा केली.

Popular Articles