– अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचे आवाहन
यवतमाळ :- राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षाकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध मॅट्रीकपूर्व शिष्यवृती योजनांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आता महाडीबीटी २.० या नवीन पोर्टलवर सुरू करण्यात आलेली आहे.
शिष्यवृत्तीच्या लाभाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याने, अचूक माहिती अर्जामध्ये भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाडीबीटी २.० पोर्टलव्दारे ऑनलाईन राबविण्यात येणाऱ्या मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनांमध्ये इयत्ता ९ वी १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, सफाई कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती (वर्ग १ ते १०), इयत्ता ५ वी ते ७ वी आणि इयत्ता ८ वी ते १० वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थीनिंना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती. (वर्ग ५ ते १०), महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क (अनुजाती) (वर्ग १० वी) या योजनांचा आहे.
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज कसा भरावा:
मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनांकरीता पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी संबंधित गट शिक्षणधिकारी यांच्याशी समन्वय करून ऑनलाईन भरावेत, पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज कोणत्याही परि स्थीतीत प्रलंबित ठेवू नयेत.
पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज विहीत मुदतीत भरून संबंधीत गट शिक्षणधिकारी यांचे लॉगिनला पाठविणे ही मुख्याध्यापकाची जबाबदारी राहणार आहे. तसेच संबंधित गट शिक्षणधिकारी यांनी त्यांच्या लॉगिनला प्राप्त अर्जाची पडताळणी करून अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या लॉगिनला फॉरवर्ड करावेत. पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज कोणत्याही परिस्थीतीमध्ये प्रलंबित ठेवू नयेत.
महाडीबीटी पोर्टल करिता https://mahadbt२.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच युजर आयडी – Pre_SE२७ XXXXXXXXXXX_Principal , (२७XXXXXXXXXXX या जागेवर शाळेचा युडाईस नं. टाकावा.
अद्यावत डिफॉल्ट पासवर्ड हा MahaDBT२#२०२६ असा आहे.
यासंदर्भात अधिक माहितीकरीता 022-49150800 / 18001025311 अथवा helpdesk@mahadbt.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क करावा. तांत्रिक अथवा प्रशासकीय तक्रारीकरीता आपल्या लॉगीनमधून स्क्रीन शॅटसह तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे. असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी मंगला मून यांनी कळविले आहे.





