spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मौदा तालुका संजय गांधी निराधार योजना समिती च्यासभेत जवळपास 300 प्रलंबित प्रकरणांचा निपटारा

– सदस्य विशाल सेलोकर यांच्या सक्रिय पाठपुराव्यामुळे समितीचे काम अधिक गतिमान

किशोर साहू, मौदा :- मौदा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना समिती गठित झाल्यापासून अध्यक्ष रामेश्वर लिचडे व नायब तहसीलदार अनिल भगत यांच्या सक्षम नेतृत्वाखाली समितीने उल्लेखनीय कार्य करत प्रलंबित प्रकरणांचा यशस्वी निपटारा केला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दिव्यांग, विधवा आणि श्रावणबाळ योजनेतील प्रकरणांना प्राधान्य देत पात्र लाभार्थ्यांना वेळेत न्याय मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण काम समिती करत आहे.

समितीने आपल्या कार्यपद्धतीत गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रणाली विकसित केली असून, अर्जांची जलद छाननी, त्वरित निर्णयप्रक्रिया, योजनांची व्यापक प्रसिद्धी आणि लाभार्थ्यांना वेळेत मदत मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे मौदा तालुक्यात संजय गांधी निराधार योजना समितीच्या कार्याची सकारात्मक दखल घेतली जात आहे.

समितीचे सदस्य विशाल सेलोकर यांनी शासनाच्या नव्या सूचना व नियमांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, योजनांचा प्रभावी प्रचार-प्रसार करणे, अर्जांचा सातत्याने पाठपुरावा करणे आणि पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ वेळेत मिळवून देण्यासाठी विशेष योगदान दिले आहे. त्यांच्या पुढाकारामुळे समितीचे काम अधिक वेगवान, सुटसुटीत आणि परिणामकारक झाले आहे.

नुकत्याच झालेल्या समितीच्या बैठकीतही जवळपास 300 प्रकरणांवर निर्णय घेण्यात आला असून, लाभार्थ्यांच्या अडचणी तातडीने सोडविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. शासनाच्या प्रत्येक कल्याणकारी योजनेचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचावा, यासाठी समिती भविष्यातही अधिक जोमाने कार्यरत राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यावेळी समितीचे अध्यक्ष रामेश्वर लिचडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजहिताच्या कार्याला निरंतर यश लाभावे, अशा मनःपूर्वक शुभेच्छा समितीच्या सर्व सदस्यांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष रामेश्वर लिचडे, सचिव नायब तहसीलदार अनिल भगत, सदस्यगण तालुका शिवसेनाप्रमुख (रामटेक विधानसभा क्षेत्र) प्रशांत भुरे, तालुका शिवसेना प्रमुख (कामठी विधानसभा क्षेत्र) नितेश वांगे, ग्रा पं बोरी (घिवारी )सरपंच विशाल सेलोकर, ग्रा पं बेरडेपार सरपंच रेवा देशमुख, ग्रामपंचायत तारसा सरपंचा वैशाली आनंद लेंडे सह इतर सदस्यगणही उपस्थित होते.

Popular Articles