नागपूर :- विदर्भातील मागील ३० वर्षांपासुन कोरडवाहु आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस काम करणारे महाराष्ट्राचे शेतकरी मिशनचे माजी अध्यक्ष किशोर तिवारी यांनी युवक काँग्रेसच्या नितीन गडकरी यांच्या घरासमोरील इथेनॉल धोरणाविरुद्ध आंदोलनावर प्रश्न उभे केले असुन महाराष्ट्रातुन अख्ख्या भारतातील २५ टक्के इथेनॉल विक्री करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याची विनंती केली आहे
पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा २५% इथेनॉल विरुद्ध विदभाचे १% पेक्षा कमी उत्पादनाचे सत्य
आज इथेनॉल उत्पादन व विक्री करणाऱ्या कंपन्यांची मालकी सर्वात जास्त काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आहे. सरकारी तेल कंपन्यांना विकल्या जाणाऱ्या एकूण इथेनॉलपैकी तब्बल २५ टक्के इथेनॉल एकट्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साखर सम्राटांकडून जाते. तर ज्या नितीन गडकरी यांच्या कुटुंबातील सदस्यांचा या व्यवसायात १ टक्का सुद्धा वाटा नाही, त्यांना बळीचा बकरा बनवून त्यांचे चारित्र्य हनन करणे, हे काँग्रेसचे दुर्भाग्य आहे असे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे व त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रमुख इथेनॉल उत्पादक नेत्यांची यादी देत त्यांच्या दारात आधी आंदोलन करा हे आवाहन करीत बाळासाहेब थोरात (संगमनेर), अशोक चव्हाण (भाऊराव चव्हाण – नांदेड), अमित/दिलीपराव देशमुख (मांजरा, विलास – लातूर), विजय वडेट्टीवार (ब्रम्हपुरी – चंद्रपूर), हर्षवर्धन पाटील (इंदापूर), विजयसिंह मोहिते पाटील (शंकरराव मोहिते – सोलापूर). शरद पवार (सहकारी साखर लॉबीचे प्रमुख), जयंत पाटील (राजारामबापू, वाळवा, कृष्णा – सांगली), शशिकांत शिंदे (किसनवीर – सातारा), अभिजित पाटील (विठ्ठल – पंढरपूर), हसन मुश्रीफ (कागल),सतेज पाटील (शाहू ग्रुप – कोल्हापूर), मानसिंगराव नाईक.अजित पवार (माळेगाव, दौंड शुगरसह अनेक कारखान्यांशी संबंधित), रोहित पवार (बारामती अग्रो – राज्यातील सर्वात मोठी खाजगी इथेनॉल कंपनी), दिलीप वळसे पाटील (भीमाशंकर – आंबेगाव), प्रकाश सोळंके (सुंदरराव सोळंके – बीड) यांची यादी दिली असुन आपण या अति सक्रीय युवक नेत्यांना युवक काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम ,अमित देशमुख ,विदर्भ सुपुत्र विजय वडेट्टीवार यांचा दारावर सुरुवातीला जाऊन आंदोलन करण्याची व इथेनॉल उत्पादन बंद करा ही मागणी करण्याची विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे .
नितीन गडकरींना लक्ष्य करणे हा निवडक आणि दुटप्पी प्रचार आहे
इथेनॉल मिश्रित पेट्रोल (E20) कार्यक्रमाला एका व्यक्तीचा, विशेषतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वैयक्तिक प्रकल्प किंवा व्यवसायिक हित म्हणून दाखवणे हा अत्यंत अन्यायकारक आणि राजकीयदृष्ट्या निवडक प्रचार आहे असा आरोप करीत किशोर तिवारी म्हणाले की ,E20 हा कार्यक्रम भारत सरकारचा सामूहिक राष्ट्रीय निर्णय आहे. तो केंद्रीय मंत्रिमंडळ, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, कृषी मंत्रालय, नीती आयोग आणि सरकारी तेल कंपन्यांच्या (IOCL, BPCL, HPCL) समन्वयातून तयार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या धोरणाचा पुढाकार घेऊन देशाची ऊर्जा सुरक्षा, परकीय चलन बचत आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी हा कार्यक्रम राबवला आहे. यात नितीन गडकरी यांचा परिवहन मंत्रालयाची कोणतीही थेट लुडबुड नाही.
काँग्रेसचा ढोंगीपणा – खऱ्या प्रश्नांवर मूग गिळून गप्प
आज देशात बेरोजगारीने थैमान घातले आहे, स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटत आहेत, शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत, संपूर्ण कृषी क्षेत्र संकटात आहे, महागाईने सामान्य माणूस होरपळत आहे, अनियंत्रित भ्रष्टाचार बोकाळला आहे – या खऱ्या जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची हिम्मत काँग्रेसमध्ये उरलेली नाही. आणि आंदोलन करायचे कशावर? तर ज्या धोरणातून स्वतःचेच नेते मलाई खात आहेत त्यावर!
विदर्भाच्या नेत्याची बदनामी व विदर्भाशी प्रतारणा – ही शोकांतिका आहे
ज्या विदर्भात १% सुद्धा इथेनॉल उत्पादन होत नाही, जिथे कोरडवाहू शेतकरी आजही आत्महत्या करतोय, त्याच विदर्भाच्या भूमीत येऊन, विदर्भाच्या सुपुत्राने ३० वर्षांपासून “शेतीतून इंधन-ऊर्जादाता शेतकरी” हा विचार मांडला, त्याच नितीन गडकरी यांच्या घरासमोर आंदोलन करणे, ही विदर्भातील शेतकऱ्यांच्या विरोधात जाणारी शोकांतिका आहे.
भाजपमधील सत्ता संघर्ष आणि काँग्रेस व आप ने घेतलेली सुपारी – किशोर तिवारी यांचा गंभीर सवाल
सध्या भाजपमध्ये अंतर्गत सत्ता संघर्ष सुरु आहे आणि इथेनॉल हा मुद्दा त्या संघर्षाचे हत्यार बनला आहे. माझा रोखठोक सवाल आहे काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे की “इथेनॉल हा फक्त गडकरींचा कार्यक्रम आहे” हा विषय जिवंत ठेवण्याची सुपारी भाजपमधीलच एका पंतप्रधान पदाची दिवसा स्वप्न पाहणाऱ्या नेत्याकडून मिळाली आहे का? ज्याप्रमाणे आप चे अरविंद केजरीवाल अशा प्रकारे सुपारी घेऊन राजकारण करतात, तशीच सुपारी काँग्रेसने घेतली असेल तर हा लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक प्रकार आहे किशोर तिवारी यांनी खंत व्य्कर्ट करीत ज्या विकास पुरुषाने जात-धर्म न पाहता रात्रंदिवस झटून सर्वांना न्याय दिला, अशा नितीन गडकरींना भाजपमधील अंतर्गत वादात सुपारी घेऊन बदनाम करण्याचा धंदा काँग्रेसने ताबडतोब बंद करावा व हिम्मत असेल तर आधी सांगली, कोल्हापूर, बारामती, सातारा, अहमदनगर येथे जाऊन आपल्याच वरील २५% मलाई





