spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भंडारा जिल्ह्यात मतदार पडताळणी मोहिमेला वेग; 99.83 टक्के प्रगणन फॉर्मचे वितरण, 84.79 टक्के फॉर्मचे डिजिटायझेशन पूर्ण

भंडारा :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात सुरू असलेल्या विशेष सघन पुनरिक्षण (Special Intensive Revision-SIR) कार्यक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्यात मतदार पडताळणीचे काम वेगाने सुरू असून, प्रगणन फॉर्म (Enumeration Forms-EFs) वितरण आणि डिजिटायझेशनमध्ये जिल्ह्याने उल्लेखनीय प्रगती केली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या 5 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंतच्या दैनिक बुलेटीननुसार ही माहिती देण्यात आली आहे.

भंडारा जिल्ह्यात 1,167 बूथ लेव्हल अधिकारी (BLO) कार्यरत असून, 30 जून 2026 रोजीच्या मतदार यादीनुसार जिल्ह्यात 10,10,788 मतदार आहेत. यापैकी 10,09,117 प्रगणन फॉर्मचे वितरण पूर्ण झाले असून, हे 99.83 टक्के इतके आहे. तसेच प्राप्त झालेल्या फॉर्मपैकी 8,57,025 फॉर्मचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून, त्याचे प्रमाण 84.79 टक्के आहे.

मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्यासाठी विशेष सघन पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून प्रगणन फॉर्म भरून घेणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे आणि माहितीचे डिजिटायझेशन करणे ही प्रक्रिया सुरू आहे.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्यांनी अद्याप प्रगणन फॉर्म सादर केलेले नाहीत, त्यांनी आपल्या संबंधित बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांसह प्रगणन फॉर्म सादर करून मतदार यादी अद्ययावत करण्यास सहकार्य करावे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.