spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

हिरोशिमा दिनानिमित्त अणुयुद्धाविरोधी जनजागृती कार्यक्रम

नागपूर :- सिंधू नवयुवक मंडळाच्या राजकुमार केवलरामानी कन्या महाविद्यालय, नागपूर येथील समाजशास्त्र विभागाच्या वतीने हिरोशिमा दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ व्याख्याते डॉ. युगल रायलू यांनी प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी समाजशास्त्र विभागाच्या प्रा. माधवी मोहरील यांनी हिरोशिमा दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले तसेच प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला.

डॉ. युगल रायलू यांनी सुमारे ४० मिनिटांच्या पॉवर पॉइंट सादरीकरणाद्वारे हिरोशिमा व नागासाकीवरील अणुबॉम्ब हल्ल्याची भीषणता विद्यार्थिनींसमोर उलगडून सांगितली. पोस्टर्स व छायाचित्रांच्या माध्यमातून अण्वस्त्रांचा मानवी जीवन, पर्यावरण आणि संपूर्ण पृथ्वीवर होणारा विनाशकारी परिणाम स्पष्ट केला. तसेच अणुयुद्ध टाळून जागतिक शांतता प्रस्थापित करण्याची आजची गरज अधोरेखित केली. संवाद सत्रात विद्यार्थिनींनी विविध प्रश्न विचारले. यावेळी सर्व विद्यार्थिनींनी “आम्हाला युद्ध नको, शांतता हवी” असा एकमुखी संदेश देत जागतिक शांततेचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमांच्या सरतेशेवटी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता चांदवाणी यांनी आपले मनोगत व्यक्त करून शांतता, मानवता आणि सहअस्तित्वाची मूल्ये जपण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. रजनी हरोडे यांनी मानले.

हिरोशिमा दिवस 

नागपूर के केवलरामानी कॉलेज में हिरोशिमा दिवस मनाया गया । आज के प्रमुख वक्ता थे,नागपूर के जाने माने वक्ता डॉक्टर युगल रायलु कार्यक्रम की सुरुवात मे प्रोफेसर माधवी मोहरील ने हिरोशिमा दिवस के बारे मे बताया और प्रमुख वक्ता का परिचय भी करवाया । अपने 40 मिनिट के पावर पॉइंट प्रेसेंटेशन मे डॉक्टर युगल रायलु नये हिरोशिमा की त्रासदि के बारेमे विद्यार्थी को बताया पोस्टर्स और फोटोग्राफ्स के द्वारा ॲटम बॉम्ब कितना विनाशकारी होता है और न्यूक्लियर युद्ध कैसे धरती को खतम कर सकता है ये बात समझाई कार्यक्रम के अंत में विद्यार्थी में सवाल पूछे और एक सूर मे ये बात कही की हम युद्ध नहीं शांती चाहते है । इस कार्यक्रम के अंत मे प्राचार्य डॉक्टर अनिता चांदवानी अपने विचार रखे और डॉक्टर रजनी हरोडे ने आभार प्रदर्शन किया ।


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.