spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या NEP 2020 (३-२-१) अभ्यासक्रम रचनेवर एकदिवसीय कार्यशाळा

नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शैक्षणिक सत्र २०२६-२०२७ पासून लागू होणाऱ्या NEP 2020 (३-२-१) पॅटर्ननुसार संरचना, योजना आणि अभ्यासक्रम या विषयावर शनिवारी ८ ऑगस्ट रोजी हजरत बाबा ताजुद्दीन कला व वाणिज्य महाविद्यालय, नागपूर येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा हजरत बाबा ताजुद्दीन कला व वाणिज्य महाविद्यालय, नागपूर, मारिया कला व विज्ञान महाविद्यालय (देवळी, वर्धा), यशोदा कन्या कला व वाणिज्य महाविद्यालय, नागपूर, अशोक मोहरकर कला व वाणिज्य महाविद्यालय (अड्याळ), उम्मे सलमा कला व विज्ञान महाविद्यालय, नागपूर तसेच अंजुमन कला महाविद्यालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे. कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात आमदार ॲड. अभिजीत वंजारी, आमदार सुधाकर अडबाले आणि संस्थेचे अध्यक्ष अब्दुल सलीम अब्दुल जब्बार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शैक्षणिक सत्रात डॉ. उमेश पालीगुंडवार, अधिष्ठाता (विज्ञान शाखा), डॉ. शामराव कोरेटी, अधिष्ठाता (मानवीय विद्याशाखा), डॉ. संजय कवठेकर, माजी अधिष्ठाता तसेच डॉ. तुषार चौधरी, अध्यक्ष, बोर्ड ऑफ स्टडीज (कॉमर्स), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे मार्गदर्शन करणार आहेत. समारोप सत्रात डॉ. अखिलेश पेशवे, प्र-कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तसेच डॉ. विजय खंडाळ आणि मो. शादाब अब्दुल सलीम यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यशाळेत प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यशाळेचे प्रमुख संयोजक प्राचार्य डॉ. शकील सत्तार यांनी केले आहे.कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. श्रीकृष्ण राजपूत, प्राचार्य डॉ. शरद सांभरे, प्राचार्य डॉ. संजय अवधूत, प्राचार्य डॉ. दुर्गेश वासनिक, प्राचार्य डॉ. शाहिदा शेख तसेच डॉ. मनीष बिहाडे हे विशेष प्रयत्न करीत आहेत.

Popular Articles