spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वडोदा ग्रामपंचायतीत ‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत वृक्षारोपण”

कामठी :- पर्यावरण संवर्धन आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आज दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक ग्रामपंचायत वडोदा येथे ‘एक पेड माँ के नाम’ या विशेष अभियानांतर्गत वृक्षलागवड कार्यक्रम उत्साहात पार पडला. या मोहिमेद्वारे गावामध्ये विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरणाचा संदेश देण्यात आला.या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी वडोदा गावचे सरपंच राजू थोटे आणि उपसरपंच दत्तू हलमारे व वडोदा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मनोज गदादे, प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत सदस्य  अमोल भिवगडे, राकेश निशाणे, आणि अर्चना गाडबैल वडोदा ग्राम पंचायत सदस्य येथील पोलीस पाटील रवींद्र हरणे, प्रतिष्ठीत नागरिक तुकाराम अतकरी यांनीही प्रत्यक्ष वृक्षलागवड करून आपला सहभाग नोंदवला. यावेळी ग्रामपंचायत वडोदा चे ग्रामपंचायत अधिकारी दिनकर इंगळे, ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी, महसूल सेवक हर्षल ठवकर, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, CRP आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने किमान एक झाड लावावे आणि त्याचे संगोपन करावे,” असे आवाहन याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी ग्रामस्थांना केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले.

Popular Articles