spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

… अखेर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना यश! 

– ERP द्वारे थेट खात्यात वेतन आणि १०% पदभरतीला मंजुरी!

किशोर साहू, मौदा :- राज्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि हक्काच्या संघर्षाला मोठे यश मिळवून देणारी बातमी समोर आली आहे. मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपी 4511 आणि सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तीव्र लढा व पाठपुराव्यामुळे कर्मचाऱ्यांच्या दोन महत्त्वाच्या मागण्यांना मंजुरी मिळाली आहे.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन आता जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा स्तरांवर न अडकता RGSA अंतर्गत ERP प्रणालीद्वारे एकदा हजेरी भरली की थेट कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा होणार आहे, तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या १०% पदभरती संदर्भातील फाईलवर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अंतिम मंजुरी दिली आहे.

या दोन्ही महत्त्वपूर्ण निर्णयांचे अधिकृत शासन निर्णय (GR) पुढील आठवड्यात निर्गमित होणार आहेत.

विधानपरिषदेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न अतिशय आक्रमकपणे मांडणारे महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे राज्याध्यक्ष आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र पाठपुरावा करणारे राज्य सरचिटणीस गिरीश दाभाडकर यांच्या नेतृत्वामुळेच हा ऐतिहासिक विजय शक्य झाला आहे.

तसेच या संपूर्ण लढ्यामध्ये संघटनेच्या सर्व प्रमुख राज्य पदाधिकारी कार्याध्यक्ष काजी अल्लाउद्दीन, उपाध्यक्ष दिलीप डिके, दत्ता भोईर, सचिव अशोक कुथे ,कोषाध्यक्ष विकास भोईर सह संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पाठींब्यामुळे व कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळेच हा लढा यशस्वी झाला आहे अशी माहिती प्रसिद्धीकर्ते मार्गदर्शक अशोक कुथे यांनी आज शुक्रवार (ता. 7 ऑगस्ट)ला दिली.

शासनाच्या या निर्णयाचे विभागीय अध्यक्ष जयदेव आंबूलकर, विभागीय सचिव दर्शन डोंगरे , जिल्हाध्यक्ष दत्ता भोयर ,जिल्हासचिव सतिस वाघमारे ,जिल्हाउपाध्यक्ष दिलीप धांडे ,जिल्हाउपाध्यक्ष सुरेश मुन, कार्याध्यक्ष अनिल जी.आंबोने, जिल्हा सहसचिवक्ष मंगेश भोतमांगे ,कोषाध्यक्ष प्रवीण वाहने ,संघटक कमलाकर गुरधे, जिल्हा सदस्यआशिष वैद्य,प्रमोद तांडेकर, आशुतोष रंगारी, गोपाल तकित ,विलास खंडार सह सर्व नागपूर जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष,सचिव आणि जिल्ह्यातील कर्मचारी यांनी आनंद व्यक्त केले असून आभार मानले आहेत.

Popular Articles