spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एम.जी. नगरातील दोन्ही बिअर बार स्थानांतरित करण्याची जोरदार मागणी

– शाळेसमोर बिअर बारमुळे कायदा-सुव्यवस्थे चा प्रश्न; नागरिकांचे आरोग्य, सुरक्षितता व शांत तेसाठी तातडीने कारवाईची मागणी

– राष्ट्रीय मांग गारुडी क्रांती सेना व आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद राष्ट्रीय बजरंग दलाचे निवेदन

कन्हान :- येथील तारसा रोडवरील एम.जी. नगर, वाघधरे वाडी परिसरात सुरू असलेल्या दोन्ही बिअर बारमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा, सार्वजनिक आरो ग्याचा व कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप करित राष्ट्रीय मांग गारुडी क्रांती सेना व आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद राष्ट्रीय आणि बजरंग दल (विदर्भ प्रांत) कन्हान शहर पदाधिकाऱ्यांनी अप्पर पोलीस अधिक्षक , कन्हान नगरपरिषद मुख्याधिकारी, उपविभागीय पो लीस अधिकारी आणि कन्हान पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली.

एम.जी. नगर परिसरातील दोन्ही बिअर बारमुळे परिसरातील नागरिकांना दीर्घकाळापासुन विविध सम स्यांना सामोरे जावे लागत आहे. रात्री उशिरापर्यंत होणारा गोंधळ, मद्यधुंद व्यक्तींचा वावर, भांडणे, शिवि गाळ, महिलांशी गैरवर्तन, वाहतुकीस अडथळे, अस्व च्छता तसेच सार्वजनिक शांततेचा भंग अशा तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. बिअर बार समोरच शाळा असल्याने विद्यार्थ्यांवरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. नगरपरिषद प्रशासनाला दिलेल्या निवेदनात दोन्ही बिअर बारचे तातडीने प्रत्यक्ष संयुक्त निरीक्षण करून स्थानिक परवा नग्या, बांधकामाची वैधता, मंजुर नकाशानुसार वापर, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य व परिसरातील नागरिकांना होणारा त्रासांची सखोल चौ कशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. नियम बाह्य बांधकाम अथवा कोणतेही उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ही करण्यात आली.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात एम.जी. नगर, वाघधरे वाडी परिसरातील वाढते गुन्हे, मारामाऱ्या, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आणि नागरिकां मध्ये निर्माण झालेली असुरक्षितता लक्षात घेता दोन्ही बिअर बारची तातडीने चौकशी करून आवश्यक कार वाई करावी तसेच दाट लोकवस्तीतील हे बिअर बार अन्य योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाकडे शिफारस करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष पाहणी करून ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा नागरिकांना लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभा रावे लागेल आणि त्याची संपुर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असा इशारा निवेदनातुन देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रीय मांग गारुडी क्रांती सेना संस्थापक उत्तम मानकर, साचिव अर्जुन पात्रे, नगरसेवक समशेर पूरवले, नरेन पात्रे, प्रीतम शेंडे, रूपेश लोंढे, बळीराम उफडे, गंगाभाऊ मानकर, कृष्णा लोंढे,निलेश पात्रे, राष्ट्रीय बजरंग दल कन्हान शहराचे नरेंद्र पात्रे, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदचे नागपुर जिल्हा महामंत्री राजेश बोपुलकर, मांग-गारोडी समाजाचे प्रतिष्ठित नागरिक रामनाथ लोंढे, माजी उपसरपंच विजय खडसे , मोगली पात्रे यांच्यासह बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

स्थानिक नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षितता, कायदा-सुव्यवस्था व शांततेच्या दृष्टीने प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संयुक्त तपासणी करावी, नियमभंग आढळल्यास कठोर कारवाई करावी आणि नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत योग्य निर्णय घ्यावा, अशी परिसरातील नागरिकांनी एकमुखी मागणी केली आहे.

Popular Articles