spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खात येथे‘एक पेड़ माँ के नाम’ उपक्रमांतर्गत भाजपाच्या वतीने वृक्षारोपण

किशोर साहू, मौदा :- ‘एक पेड़ माँ के नाम’ या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी, खात यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, हरित परिसर निर्मिती आणि भावी पिढीसाठी स्वच्छ व निरोगी पर्यावरण निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

वृक्ष हे केवळ पर्यावरणाचे रक्षण करणारे नसून, आपल्या पुढील पिढीसाठीची अमूल्य संपत्ती आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आईच्या सन्मानार्थ एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष मुकेश अग्रवाल, सरपंचा खात माधुरी वैद्य, माजी सरपंच कैलास वैद्य, उपसरपंच रवींद्र मांडरकर, ग्रामपंचायत सदस्या प्रियंका आंबीलढूके, राहुल वैद्य, ज्ञानेश्वर राठोड, लेखपाल पटले तसेच ग्रामपंचायत कर्मचारी आर्शीवाद ढोलवार यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पर्यावरण संवर्धनाचा हा संदेश प्रत्येक गावापर्यंत पोहोचवत ‘एक पेड़ माँ के नाम’ हा उपक्रम अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

Popular Articles