spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विमेन्स आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये TNS इंडिया फाउंडेशनच्या कॉमर्स स्टडी फोरमचे उद्घाटन

नागपूर :- विमेन्स आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, नंदनवन येथे TNS इंडिया फाउंडेशनच्या कॉमर्स स्टडी फोरमचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. विद्यार्थ्यांमध्ये वाणिज्य विषयाविषयी अभ्यासाची आवड निर्माण करणे, नेतृत्वगुण विकसित करणे तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांद्वारे त्यांचे व्यक्तिमत्त्व घडविणे हा या फोरमचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमासाठी TNS इंडिया फाउंडेशनचे प्रोग्राम स्पेशालिस्ट व प्रशिक्षक सिद्धार्थ पाटील आणि प्रिया प्रसाद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गायकवाड तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) समन्वयक डॉ. श्यामकुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत फोरमच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात.

कार्यक्रमाचे आयोजन कॉमर्स विभागाच्या प्रमुख डॉ. अलका ब्राह्मणकर यांच्या मार्गदर्शनात विभागातील सर्व प्राध्यापकांनी केले. कार्यक्रमाचे संचालन वेदिका नाईक यांनी तर नाझिया यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी कॉमर्स स्टडी फोरमच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये भूमिका वर्मा यांची अध्यक्षपदी, भूमिका बंजारे यांची सचिवपदी, तर अल्फिया अंजुम, पलक धुरटकर आणि धारिया तबस्सुम शेख यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे महाविद्यालय प्रशासन, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.