spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अविवाहित तरुणाची गळफास लावून आत्महत्या

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गादा गावातील एका अविवाहित तरुणाने घरात कुणी नसल्याचे संधी साधून घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी 7 दरम्यान निदर्शनास आली असून मृतक तरुणाचे नाव अश्विन संजय भोयर वय 28 वर्षे रा रविदास नगर कामठी असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतकाचे आई वडील मोल मजुरी साठी गेले असता घरात कुणी नसल्याचे संधी साधून सदर तरुणाने घराच्या छताला दुपट्ट्याने गळफास लाऊन आत्महत्या केली. मृतकाचे आई वडील कामाहून घरी परतल्याने ही घटना निदर्शनास आल्याने सर्वांना एकच धक्का बसला . घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत पुढील उत्तरिय तपासणीसाठी शवविच्छेदनगृहात हलविण्यात आले.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्या चे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.

Popular Articles