नागपूर :- परदेशात एमबीबीएस शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या संधी, पारदर्शक प्रवेश प्रक्रिया आणि शिक्षणापासून ते पदवीप्राप्तीपर्यंतच्या सर्वंकष मार्गदर्शनाची माहिती देण्यासाठी एन.आय.ओव्हरसीज (National International Overseas Consultancy) च्यावतीने पत्रकार परिषदेत संस्थेचे मार्गदर्शक नागपुरातील डॉ. उमंग कडू यांनी सविस्तर माहिती पत्रकारांना दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, रशिया, कझाकस्तान, उझबेकिस्तान, जॉर्जिया आणि किर्गिस्तान यांसारख्या NMC मान्यताप्राप्त देशांमध्ये एमबीबीएस शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व विश्वासार्ह प्रवेश प्रक्रिया उपलब्ध करून दिली जाते. विद्यापीठांच्या निवडीबाबत विद्यार्थ्यांना योग्य माहिती देणे, प्रवेश प्रक्रिया तसेच १०० टक्के पारदर्शक मार्गदर्शन दिले जाईल. परदेशातील शिक्षणासाठी व्हिसा प्रक्रिया, प्रवास नियोजन, विमानतळावर स्वागत सुरक्षित प्रवास व्यवस्था, निवास, भारतीय भोजन, स्थानिक सिम कार्ड, बँक खाते उघडणे तसेच आवश्यक प्रशासकीय प्रक्रियांमध्येही संस्थेकडून मदत केली जाते. याशिवाय परीक्षेची तयारी, भारतातील करिअरच्या संधी आणि पुढील वैद्यकीय शिक्षणाबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार. संस्थेने गेल्या सहा वर्षांत एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना यशस्वी मार्गदर्शन केले असून प्रवेशापासून पदवीप्राप्ती पर्यंत सातत्याने सहकार्य केले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन, सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आणि परदेशात शिक्षणादरम्यान आवश्यक त्या प्रत्येक टप्प्यावर मदत देण्यावर संस्थेचा भर असल्याचे डॉ. उमंग कडू यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. डॉ. कडू म्हणाले, “विद्यार्थ्यांचा प्रवास केवळ प्रवेश मिळाल्यानंतर संपत नाही, तर त्यांचे शिक्षण सुरक्षित, आत्मविश्वासपूर्ण आणि यशस्वी होईपर्यंत आमची जबाबदारी कायम राहते. परदेशातील शिक्षणाचा संपूर्ण प्रवास विद्यार्थ्यांसाठी सुलभ आणि विश्वासार्ह करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” या पत्रपरिषदेत परदेशातील वैद्यकीय शिक्षणाबाबत विद्यार्थी, पालक आणि माध्यम प्रतिनिधींना विविध महत्त्वाच्या बाबींची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी योग्य माहितीच्या आधारे निर्णय घेऊन आपल्या वैद्यकीय करिअरची दिशा निश्चित करावी, असे आवाहनही यावेळी केले. पत्रपरिषदेला मंचावरील एन आय ओव्हरसीज कन्सल्टन्सीचे फाउंडर सुरेश कडू, सोबत रितेश तराने व नरेंद्र तायडे यांची उपस्थिती होती.
विदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना एन.आय.ओव्हरसीज कन्सल्टन्सी तर्फे मार्गदर्शन









