spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बालिकेवरील अत्याचारप्रकरणी बाल हक्क आयोगाची पोलिसांशी चर्चा

प्रतिनिधि, भंडारा :- भंडारा शहरातील आंबेडकर वॉर्ड परिसरात साडेतीन वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याच्या गंभीर घटनेची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाच्या सदस्या गीतांजली बुटी यांनी भंडारा पोलीस अधीक्षक कार्यालयास भेट देत संबंधित प्रकरणाचा आढावा घेतला. तसेच त्यांनी पोलीस विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली.

या प्रकरणातील तपास अधिकारी, विशेष बाल पोलीस पथक (SJPU) यांच्याकडून प्रकरणाच्या कार्यवाहीचा अहवाल घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पीडित बालिकेची सद्यस्थिती, वैद्यकीय तपासणी व उपचार तसेच तिला व कुटुंबाला देण्यात आलेल्या समुपदेशनाबाबतही आयोगाने माहिती मागविली आहे. संशयित आरोपीची अटक, पोलीस कोठडी व तपासाची सद्यस्थिती याबाबतचा अहवालही आयोगास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Popular Articles