किशोर साहू, मौदा :- पी एम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत विविध उपक्रम साजरे करण्यात येतात. या शनिवारी (8 जुलै) ला वेशभूषा आणि समूहगीत हा उपक्रम राबविण्यात आला. गटशिक्षणाधिकारी पं. सं. मौदा संकेत मरसकोल्हे यांच्या योग्य नियोजनानुसार मौदा पंचायत समिती अंतर्गत दर शनिवारी प्रत्येक शाळेत विविध उपक्रम साजरे करण्यात येतात. गटशिक्षणाधिकारी संकेत मरस्कोल्हे प. स. मौदा यांनी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे शनिवारी आकस्मिक भेट देऊन विविध उपक्रमाची पाहणी केली.
याप्रसंगी मरस्कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.आपल्या मार्गदर्शन पर भाषणात विद्यार्थीना त्यांच्या जीवनात कश्या प्रकारे यश मिळेल, याबद्दल मार्गदर्शन केले. हा उपक्रम राबविणे मागचा हेतू विद्यार्थ्यांना सांगण्यात आला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितेश इंगळे उपस्थित होते.
मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी गटशिक्षणाधिकारी संकेत मरसकोल्हे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी आपल्या मनोगतात शाळास्तरावर विविध उपक्रम कसे साजरे केले जातात याची माहीती गटशिक्षणाधिकारी यांना दिली.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले,राणी लक्ष्मीबाई, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा ,सीमेवर रक्षण करणारे सैनिक यांच्या वेशभूषा धारण करून विद्यार्थी शाळेत उपस्थित झाले होते. यानंतर सर्व वर्गातील विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर समुहगित साजरे करण्यात आले. देशभक्तीपर गीत सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमा अंतर्गत म्हणून दाखवेले. आनंददायी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये आनंद निर्माण करून या उपक्रमाचा आनंद घेण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद सुधीर खंडाईत,सुधीर कांबळे, राजेश रोहाड , सुजाता बोधले , प्रज्ञा रामटेके, संगीता कारेमोरे ,पुष्पलता उके,उमेश उके, कैलास फटिंग यांनी सहकार्य केले. आभार राजेश रोहाड यांनी केले.





