spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वंदे मातरम प्रदर्शनीचे उद्घाटन

– हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत तिरंगा रांगोळी प्रदर्शनी

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्यावतीने केंद्र शासनाच्या सुरु असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत अनेक उपक्रमांचे आयोजन सुरु असून आज (ता.१०) कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे तिरंगा ‘वंदे मातरम’ प्रदर्शन आणि मोठ्या आकाराची तिरंगा रांगोळी प्रदर्शनी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, महापौर निता ठाकरे, आमदार संजय भेंडे, आमदार कृपाल तुमाने, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेता नरेंद्र (बाल्या) बोरकर, आयुक्त डॉ. विपीन, मुख्यमंत्री कार्यालयातील सहसचिव आशा पठाण, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, माजी महापौर दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त मुरुगानंथम, अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, एमआयएमचे गटनेता  शकील पटेल, मुस्लिम लिगचे गटनेता असलम मुल्ला खान, शिवसेना (उबाठा) गटनेता किशोर कुमेरिया, शिवसेनेचे गटनेता गणेश चर्लेवार, बसपाच्या गटनेत्या श्रीमती हर्षला जयस्वाल, मा्जी आमदार नाना शामकुळे, महिला व बालकल्याण विशेष समिती सभापती सारिका नांदुरकर, नगरसेवक श्रीकांत आगलावे व इतर मान्यवर उपस्थित होते.

भारतीय स्वतंत्रता संघर्षा दरम्यान भारतीय ध्वजाचे बदलत गेलेले स्वरूप, स्वतंत्रता संघर्षातील ‘वंदे मातरम्’ चे प्रेरणादायी योगदान संदर्भातील माहिती आणि शहिद भगतसिंग, महात्मा गांधी, नेताजी सुभाष चंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांसारख्या स्वतंत्रता सैनिकांच्या प्रतिमेसह त्यांच्या कार्याचा आढावा विशेष आकर्षण ठरले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मोठ्या आकाराच्या तिरंगा रांगोळीच्या कलेचे कौतुक केले व तिरंगा ‘वंदे मातरम’ प्रदर्शनीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये देशाच्या स्वतंत्रता संघर्षातील महापुरुषांच्या योगदाना विषयी जागरूकता आणि अभिमान निर्माण होईल, असे मत व्यक्त केले. दरम्यान पालिकेच्या आगामी कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी जास्तीतजास्त संख्येने सहभागी होऊन देशभक्तीच्या वातावरणाला अधिक प्रबळ करावे’ असे आवाहन महापौरांच्या वतीने करण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.