spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘एक अटल भारत’ नाटकाद्वारे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन

§ सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे 15 ऑगस्ट रोजी

 – मुंबईत विशेष मराठी नाट्यप्रयोगाचे आयोजन

मुंबई :- सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला ‘एक अटल भारत’ या विशेष मराठी नाट्यप्रयोगाचे आयोजन शनिवार, 15 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6.00 वाजता दीनानाथ मंगेशकर सभागृह, विलेपार्ले (पूर्व), स्टेशनसमोर, मुंबई येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रमास सर्व रसिकांसाठी विनामूल्य असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी हे प्रख्यात संसदपटू, प्रतिभावान कवी आणि दूरदर्शी राष्ट्रनेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रभावी नेतृत्वाने, लोकशाही मूल्यांवरील दृढ निष्ठेने आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान देणाऱ्या विचारांनी भारतीय राजकारणावर आणि सार्वजनिक जीवनावर अमिट ठसा उमटविला. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा नाट्यप्रयोग त्यांच्या राष्ट्रदृष्टिकोनाला आणि सार्वजनिक जीवनातील योगदानाला आदरांजली वाहणारा ठरणार आहे.

‘एक अटल भारत’ या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन विशाल सोनावणे यांनी केले असून, संकल्पना अमरजीत मिश्र यांची आहे. रविंद्र प्रोडक्शनच्या कलाकारांकडून या नाटकाचे सादरीकरण करण्यात येणार असून, अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारविश्वाचा, व्यक्तिमत्त्वाचा आणि राष्ट्रसेवेचा प्रेरणादायी प्रवास रंगमंचावर प्रभावीपणे उलगडला जाणार आहे.

हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. राज्यभर विविध नाट्य, संगीत, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याचे कार्य सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सातत्याने करण्यात येत आहे. देशभक्ती, लोकशाही मूल्ये आणि राष्ट्रनेत्यांचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने अशा सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

मुंबई व परिसरातील नाट्यरसिक, विद्यार्थी, युवक, सांस्कृतिक उपक्रम प्रेमी आणि नागरिकांनी या विशेष नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.