भंडारा :- ९ ऑगस्ट रोजी भिलेवाडा (कारधा) येथील राजे छत्रपती मूकबधिर निवासी विद्यालयात विद्यार्थ्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांसाठी भोजनदान तसेच बिस्कीट वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, अन्नदानासोबतच विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवत त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.
“आपल्या आनंदातील थोडासा वाटा इतरांना दिल्यास मिळणारे समाधान हे कोणत्याही भेटवस्तूपेक्षा मोठे असते,” अशी भावना दिपेश मिरासे यांनी व्यक्त केली.
यावेळी जितू ढेंगे, सोन्या मिरासे, सुधांशू वणवे, गौतम काळे, मुकेश माटे, बादल उके यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होते.





