खापा, वार्ताहर :- राष्ट्रीय/राज्य पुरस्कृत आदर्श शिक्षक असोसिएशन महाराष्ट्र राज्याची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. सुनिल शंभुदयाल नायक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड प्रक्रियेत डॉ. प्रदीप माधवराव बिबटे यांची राज्याध्यक्षपदी, तर बळीराम दादाजी चापले यांची राज्य सरचिटणीसपदी सर्वानुमते निवड झाली.

जगन्नाथ पोटे यांची राज्य कार्याध्यक्ष, सुनिल नायक यांची कोषाध्यक्ष, गजानन कुरवाडे व डॉ. शारदा रोशनखेडे यांची उपाध्यक्ष, तर डॉ. चित्रा मजुमदार व विजया कोकमवार यांची सहसचिव म्हणून निवड करण्यात आली. पक्षभान ढोक, शेषराव घाटोळे, रंजना सोरमारे व रामप्रसाद मस्के यांची कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली.
निवडीनंतरच्या बैठकीत आदर्श शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून शासनदरबारी शिक्षकांच्या मागण्यांसाठी प्रभावीपणे पाठपुरावा करण्याचा निर्धार करण्यात आला. नूतन कार्यकारिणीचे शिक्षकवर्गातून अभिनंदन होत आहे.





