spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शासकीय आश्रमशाळेतील मुलींना आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण मिळणार

–  ६०० विद्यार्थिनींना मार्शल आर्ट, ज्यूडो कराटे किट ;

– १०० विद्यार्थ्यांना संगीतकलेचे प्रशिक्षण

– कार्यशाळा आयोजनासाठी शासकीय यंत्रणा व संस्थांकडून मागविले प्रस्ताव

यवतमाळ :- राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या २०१३ च्या शासन निर्णयानुसार न्युक्लिअस बजेट अंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना मानव साधन संपत्ती विकासाच्या तसेच विविध कल्याणात्मक योजनांचा लाभ दिला जात आहे.

या योजनेअंतर्गत दोन उपक्रमांचा समावेश आहे. त्यामध्ये शासकीय आश्रमशाळेतील मुलींना आत्मसंरक्षणासाठी मार्शल आर्ट किंवा ज्‌यूडो कराटेची किट देऊन तीन महिन्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा लक्षांक ६०० विद्यार्थिनींचा असून, प्रति लाभार्थी २ हजार रुपये याप्रमाणे एकूण १२ लाख रुपयांची तरतूद आहे.

तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुगम व शास्त्रीय गायन, तबला वादन आणि संगीतकलेची तीन महिन्यांची कार्यशाळा आयोजित करण्याची योजना आहे. या उपक्रमासाठी १०० विद्यार्थ्यांचा लक्षांक असून, प्रति लाभार्थी ५ हजार रुपये याप्रमाणे एकूण ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या योजनांसाठी शासकीय यंत्रणा व संबंधित संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले असून इच्छूकांनी त्यांचे प्रस्ताव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा येथील सेतू कक्षामार्फत २६ ऑगस्ट २०२६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रेवैयाह डोंगरे यांनी केले आहे.

Popular Articles