spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

धर्मराज शाळेत ग्रामोन्नती सेवा प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप

कन्हान ५ : – येथील धर्मराज प्राथमिक व माध्यमिक शाळेत ग्रामोन्नती सेवा प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना आज (ता ४) शालेय साहित्याचे वाटप माजी खासदार  प्रकाश भाऊ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक खिमेश बढिये तर प्रमुख पाहुणे म्हणुन ग्रामोन्नती सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक, माजी खासदार  प्रकाश भाऊ जाधव उपस्थित होते. यावेळी मंचावर ज्येष्ठ शिक्षिका चित्रलेखा धानफोले, ग्रामोन्नती सेवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिलीप राईकवार, सचिव सचिन साळवी, ज्येष्ठ शिक्षक दिनेश ढगे, ग्रामो न्नती सेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी पुरुषोत्तम येणेकर, संतोष गिरी, जाफर सैय्यद, जीवन ठवकर, रूपेश सातपुते, तेजस रोडेकर उपस्थित होते.
गरीब व गरजवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व निरंतर शिक्षणाचा प्रवास सुरू राहण्या साठी ग्रामोन्नती सेवा प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक मदत करण्यात येत असल्याचे ग्रामोन्नती सेवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार  प्रकाश जाधव यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदती चा हात पुढे केल्याबद्दल मुख्याध्यापक खिमेश बढिये यांनी प्रतिष्ठान चे धन्यवाद व्यक्त केले. प्राथमिक विभा गाच्या ७० तर माध्यमिक विभागाच्या ८६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश खोब्रागडे यांनी तर संचालन भिमराव शिंदेमेश्राम यांनी केले. उपस्थि तांचे आभार  हर्षकला चौधरी यांनी मानले. कार्यक्र माच्या आयोजनासाठी कु अर्पणा बावनकुळे, किशोर जिभकाटे, राजु भस्मे, नरेंद्र कडवे, सतिश राऊत, अमीत मेंघरे,  प्रिती सुरजबंसी,  शारदा समरीत,   पूजा धांडे, कु उत्तरा बन्सोड यांनी सहकार्य केले

Popular Articles