spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कारची ऑटोला धडक; तीन महिला प्रवासी जखमी

सचिन चौरसिया, रामटेक :- अंबाळा इथून काही प्रवासी ऑटोनी रामटेक बस स्थानकवर येत असतांना वेगात येणाऱ्या कारने विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ऑटोला जोरदार धडक दिली. या अपघातात तीन महिला प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बायपास मार्गावरील लंबे हनुमान मंदिरजवळ असलेल्या वळणावर मंगळवारी (दि.११) रोजी दुपारी २ च्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ३१/डीएस ०९४१ क्रमांकाच्या हा ऑटो अंबाळा येथील प्रवाशांना रामटेक बसस्थानकावर सोडण्यासाठी जात असतांना रामटेक बायपासमार्गे तुमसरकडे लंबे हनुमानमंदिर परिसरातील वळणावर समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच ४७/क्यू १६६२ क्रमांकाच्या कारने ऑटोला जोरात धडक दिली. त्यातील तीन महिला जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी तातडीने योगिराज हॉस्पिटल रामटेक येथे दाखल करण्यात आले.अपघातात ऑटोचे मोठे नुकसान झाले असून माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी व पंचनामा केला. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

अवजड वाहनांच्या पार्किंगमुळे वाढला धोका

लंबे हनुमानमंदिर परिसरात नाश्ता करण्यासाठी रस्त्याच्या कडेला, विशेषतः वळणावर मोठमोठी अवजड वाहने उभी राहत असल्याने इतर वाहनचालकांना रस्ता ओलांडताना प्रचंड अडथळा निर्माण होतो. अनधिकृत पार्किंगमुळे अपघातांचा धोका वाढला असून प्रशासनाने येथे वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Popular Articles