spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एकात्मता उच्च प्राथमिक विद्यालय येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम उत्साहात संपन्न

नागपूर :- एकात्मता उच्च प्राथमिक विद्यालय, एकात्मता नगर, जयताळा, नागपूर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धापूर्वक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला अभिवादन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना शुभांगी कातोरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याची, त्यांच्या लोककल्याणकारी कार्याची, न्यायप्रियतेची तसेच समाजहितासाठी केलेल्या योगदानाची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनीही अहिल्यादेवींच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त करून त्यांच्या आदर्श विचारांचा अंगीकार करण्याचा संदेश दिला. तसेच ‘लोककल्याण, न्याय, सेवा आणि समतेचा आदर्श’ अशी ओळख निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक शरद उरकुडे यांनी केले. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुनीता गावंडे, धनश्री ढेगेकर, सोनल फुंदे यांनी सहकार्य केले.

Popular Articles