– सरपंचा लुंबिनी महेश कलारे यांच्या हस्ते ध्वजारोहण, 10वी-12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते गावात विविध ठिकाणी ध्वजारोहण
किशोर साहू, मौदा :- देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन चाचेर येथे मोठ्या उत्साहात, देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंचा लुंबिनी महेश कलारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर महात्मा गांधी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
ग्रामपंचायत चाचेरचा गेल्या मागील 8 वर्षांपासूनचा एक सुंदर उपक्रम यावेळीही राबविण्यात आला. 15 ऑगस्टच्या निमित्ताने 10वी व 12वी च्या परीक्षेत गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या मुला-मुलींच्या हस्ते गावातील विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहण करणारे 10वी 2025 गुणवंत विद्यार्थी अंजली अर्जुन घिवतोंडे प्रथम (90%) , ऋतिका रविंद्र वानखडे द्वितीय (88%) लोकेश प्रवीण सावरकर तृतीय (77.40% ),
बारावीतील गुणवंत विद्यार्थी भावेश बबलू बरबटे(73% ) प्रथम,कु. शीतल मनोहर लांजेवार(71.17% ) द्वितीय,
वंशिका धर्मापाल गजभिये ( 70% ) तृतीय यांच्या हस्ते गावात विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची प्रेरणा निर्माण होऊन चांगल्या मार्कांनी पास होऊन गाव व आई-वडिलांचे नाव उंचावण्याची भावना निर्माण झाली आहे.
चाचेर येथील पीएम श्री उच्च प्राथमिक शाळेतही ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व भाषणे सादर केली.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्यगण शैलेश कोपरकर, प्रकाश वाकलपुडी, सुरेंद्र टेंबरे, योगेश निनावे, चंद्रकला धोटे, सुमन सोमकुवर, नलू दरवई, सविता जांभरे, रोशनी किरपान, ममता चौरे ,मुख्याध्यापक अनिल राजहंस गडपायले, पदवीधर शिक्षक रवींद्र घुगे,परवीन शेख , सहाय्यक शिक्षक भारती साखरवाडे , संगीता बालकोटे, प्रिती खंगार,शिल्पा उकुडवे , रुचिला खंडाईत , नेहा निमजे , डॉ. दिनेश कोपरकर,सुरेश खंडाईत,डॉ. बाबा शेख, रामू खंडाईत,राकेश राऊत, विनोद कोपरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जीवन सहारे, माजी अध्यक्ष किरण बरबटे, प्रकाश काळे, ज्ञानेश्वर नाकाडे, भोला बावनकुळे, राजेश हुमणे, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी व गावकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक अनिल गडपायले यांनी केली. सूत्रसंचालन रवींद्र घुगे यांनी केले तर आभार प्रदर्शन परवीन शेख यांनी मानले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.








