नागपूर :- अमरनगर ज्येष्ठ नागरिक मंडळ, नागपूर आणि अमरनगर सुधार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचा ८० वा, स्वातंत्र्यदिन सोहळा शनिवार, १५ ऑगस्ट रोजी अमरनगर येथील हनुमान मंदिर परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक बाबाराव तायडे होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी राष्ट्रगीत सादर करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. या कार्यक्रमात नगरसेवक बाबाराव तायडे, मंडळाचे अध्यक्ष देविदास आगरकर, प्रवीण ठाकरे आणि डॉ. राजेश कुऱ्हाडे यांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व व नागरिकांची सामाजिक जबाबदारी यावरील मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी गणपतराव निंबाळकर यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रवीण धनजोडे, आशिष निंबाळकर, वसंतराव इझनकर, रमेश जिल्हारे, भोयर, मंचलवार, वरगट, बांगडे, धवल, हिरुळकर, रासेकर, लांजेवार, कांबळे, दुधे, रासेकर, आगरकर, निंबाळकर आणि गौरखेडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला अमरनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीपर कार्यक्रम उत्साहात पार पडला.








