spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गट ग्रामपंचायत भांडेवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

किशोर साहू, मौदा :- गट ग्रामपंचायत भांडेवाडी येथे सरपंचा मंगला विष्णु देशमुख यांनी घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी गट ग्रामपंचायत भांडेवाडी अंतर्गत येत असलेल्या भांडेवाडी, शिवाडौली, सावंगी या तिन्ही गावातून जो मुलगा किंवा मुलगी वर्ग बारावी मध्ये सर्वात जास्त टक्केवारी घेईल , तो मुलगा किंवा मुलगी ग्रामपंचायत भांडेवाडी येथील झेंडावंदन करण्याचे मानकरी ठरेल .या वर्षाची मानकरी सावंगी येथील इश्या नारायण हुड या मुलीने नवोदय विद्यालय खैरी येथून 84% मार्क घेऊन प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे  इश्या ला झेंडावंदन करण्याचा मान मिळाला व तिच्या ग्रामपंचायत तर्फे शाल, श्रीफळ व प्रोत्साहन बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.

जिल्हा परिषद शाळा भांडेवाडी येथील विद्यार्थ्यांनी 15 ऑगस्ट या विषयावर भाषणाच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली तसेच जि.प.शाळा भांडेवाडी येथील स्कॉलरशिपच्या परीक्षेत दोन मुलीने मौदा तालुक्यात सर्वात जास्त मार्क घेऊन प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल सरपंचा मंगला विष्णू देशमुख यांनी त्या दोन्ही मुलीला पुष्पगुच्छ व स्कूल बॅग भेट देऊन त्यांचा सत्कार केला.

या कार्यक्रमाला ग्रा.प. सदस्य अंकुश वाघाडे , किसना वाढवे, अंजिरा राऊत, राहुल चौधरी, दामोदर वगारे, नितेश शेंडे, गौरीशंकर रामटेके, अरुण वाघाडे, मुख्याध्यापिका शितोडे , शिक्षिका तळेकर , वंदना चौधरी, शाळा समितीचे सदस्य गण व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे कार्यक्रमाच्या आनंद द्विगुणीत केला.

Popular Articles