पांढरकवडा :- केशव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,वणी शाखा-पांढरकवडा येथे भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉ. हेडगेवार रक्तपेढी, नागपूर यांच्या तर्फे डॉ. रामकृष्ण रणदिवे व अनिल परमाळे यांच्या नेतृत्वात एकुण १४ जणांच्या चमूने रक्तदात्याची तपासणी व रक्त संकलन केले. शिबिराला नागरिक, संस्थेचे सभासद तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
डॉ. हेडगेवार रक्तपेढी, नागपूर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांची आवश्यक तपासणी करून रक्तसंकलन करण्यात आले. रक्तदान हे सामाजिक बांधिलकीचे कार्य असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वंदनिय भारतमाता, प.पू.डॉ केशव बळीराम हेडगेवार व पू. गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे संचालक प्रदीप राशतवार, नगर संघचालक डॉ. किरण मायी, माजी सैनिक सचिन कर्णेवार व संदिप कुळकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर रक्त संकलन करणाऱ्या चमूचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सदर शिबिराचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक दिकुंडवार यांनी केले. यावेळी १०३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदात्यांचा प्रशस्तिपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर खोंड, उपाध्यक्ष दौलत वाघमारे, मानद सचिव अनिल अक्केवार, संचालक प्रदीप राशतवार, सतिश कुल्दीवार, तज्ञ संचालक विनय कोंडावार यांची उपस्थिती होती. रक्तदान शिबीराला यशस्वी करण्यासाठी पांढरकवडा शाखेचे शाखा व्यवस्थापक सुमित पोटपेल्लीवार, राजेश गैनीवार, प्रशन्न बडवे, श्रद्धा राऊत, आदित्य पारखे, सानिका मोहुर्ले, व दैनिक अभिकर्ता यांनी परिश्रम घेतले. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिन सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आल्याने उपस्थितांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले.








