नागपूर :- १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कान्होली येथे विद्यार्थ्यांना गावचे उपसरपंच मिलिंद रमेश कोवे यांच्या तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे केंद्रप्रमुख भूपेश चव्हाण, मुख्याध्यापक वसंत पिसे, शिक्षिका सुषमा ठाकरे, अंगणवाडी शिक्षिका मीना कोवे, मदतनीस आचल कोवे, तसेच सुलोचना चवळे, नीता रंदई, सुनीता वलके, सुवर्णा वाघमारे, अरविंद उईके, गजानन खंडारे आणि केशव डायरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल शाळेच्यावतीने उपसरपंच मिलिंद रमेश कोवे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.








