हंसराज,भंडारा :- आगामी राजकीय आव्हाने आणि संघटनात्मक बांधणी लक्षात घेता, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नूतन कार्यकारिणीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने अधिकृत मान्यता दिली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रस्तावित कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर यांनी दिली. या निवडीबद्दल साखरकर यांनी प्रदेश नेतृत्वाचे आभार मानले असून, “ही कार्यकारिणी सर्वसमावेशक असून काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज आहे,” असा विश्वास व्यक्त केला आहे.
या कार्यकारिणीत अनुभवी आणि तरुण कार्यकर्त्यांचा समतोल राखण्यात आला आहे. यामध्ये उपाध्यक्ष म्हणून अशोक कापगते, शफी लधाणी, विकास राऊत, प्रभू मोहतुरे, राजू निर्वाण, अमर रगाडे, आशीष पात्रे, धनंजय तिरपुडे, धर्मेंद्र नंदरधने, घनश्याम भांडारकर, भरत खंडाईत, प्रणाली ठाकरे.यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदाची जबाबदारी अश्विन नशिने यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
सरचिटणीस पदी राजकपूर राऊत, निलेश सावरबांधे, मोहम्मद अली खान, सुनील गिर्हेपुंजे, उत्तम भागडकर, आकाश कोरे, बाळा ठाकूर, रमेश पारधी, स्वाती वाघाये, रामचंद्र परशुरामकर, सुभाष आजबले, शिवलवंत मडमे, देवेंद्र हजारे, शमिम शेख, विजय दुबे, शंकर तेलमासरे. यांची निवड झाली आहे. सचिव म्हणून प्रेम बनवे, दिलीप मासूरकर, कृष्णकांत बधले, गजानन झंझाड, मिरा उरकुडकर, शरद तिडके, महेश कोराम, पृथ्वी तोंडकर, ज्ञानेश्वर पंचभाई, जितेंद्र रेहपाडे, दीपक मेंढे, लालचंद करंजेकर, सुभाष न्यायमूर्ती, अनिल किराणापुरे, विजुभाऊ साखरे, राकेश लितडे, गुलाब कापसे, सुभाष राजूट, प्रकाश देशकार, शामभाऊ शिवणकर, बंडू वाघाये, ईश्वर गोपाले, विजय चौधरी, परमेश्वर देशमुख, श्रीकांत डोरेल, लक्ष्मण फटींग, पवन मस्के, दिलीप उके, जागृती बिसने, मंगेश हुमणे, संदेश शामकुंवर काम पाहतील.
याशिवाय, जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी मंत्री, माजी खासदार, माजी आमदार, लोकसभा व विधानसभा उमेदवार तसेच आघाडी संघटनांच्या जिल्हाध्यक्षांचा कायम निमंत्रित सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून, लवकरच जिल्हाभरात संघटनात्मक कामाला गती दिली जाणार आहे.








