किशोर साहू, मौदा :- बुधवार ( ता. 19 ऑगस्ट) ला अरोली पोलीस स्टेशन येथे ठाणेदार स्नेहल राऊत यांची शासकीय बदली स्थानिक गुन्हे शाखेत झाल्याने त्यांना भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला. अरोली परिसरात त्यांनी बजावलेल्या कर्तव्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करून त्यांच्या पुढील शासकीय सेवेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तर स्थानिक गुन्हे शाखेतून अरोली पोलीस स्टेशन मध्ये रुजू झालेले नवनियुक्त ठाणेदार सागर गोमासे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा तालुका मौदा मंडळ अध्यक्ष भगवान बावनकुळे, तालुका समन्वय समिती सदस्य नरेश बावनकुळे, अरोली पंचायत समिती गणातील भाजप नेते विष्णू देशमुख, बोरी घिवारी सरपंच विशाल सेलोकर, बेरडेपार सरपंच रेवाराम देशमुख, जिल्हा युवा मोर्चा मंत्री निलेश बावनकुळे उपस्थित होते.





