कामठी :- निंबाजी वस्ताद अखाडा येथे पारंपरिक गुरुपूजा सोहळा भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कुस्ती क्षेत्रातील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व प्रदर्शित करणाऱ्या या सोहळ्यात गुरुजनांचे विधिवत पूजन करून त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
गुरुंच्या मार्गदर्शनातून घडलेली कुस्तीची समृद्ध परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. अखाड्यातील शिस्त, संस्कार, व्यायाम आणि कुस्तीच्या परंपरेचे जतन करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.
या प्रसंगी अजय कदम, पंकज रडके, दीपक सीरिया, राहुल यादव यांच्यासह अखाड्यातील पदाधिकारी, मल्ल व कुस्तीप्रेमी उपस्थित होते. गुरुपूजेच्या निमित्ताने अखाड्यात उत्साहाचे आणि पारंपरिक वातावरण निर्माण झाले होते.





