spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

उद्योगमंत्री सामंत उद्या जिल्ह्यात

– नवेगावबांध येथे ‘पुस्तकांचे गाव’ दालनाचे लोकार्पण; उद्योजक, लोकप्रतिनिधी व साहित्यिकांशी साधणार संवाद

पंकज परशुरामकर,इनसाइडर न्यूज टुडे 

नवेगाव बांध :- राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ. उदय सामंत उद्या, शुक्रवार दि. २१ ऑगस्ट रोजी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यात उद्योग, ग्रामोद्योग आणि मराठी भाषा विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे.सकाळी १० वाजता नवेगावबांध येथे मंत्री डॉ. सामंत यांच्या उपस्थितीत ‘पुस्तकांचे गाव’ दालनाचे लोकार्पण होणार आहे. या उपक्रमामुळे नवेगावबांधच्या साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्राला नवी ओळख मिळण्याची अपेक्षा आहे.दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योग विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच खादी व ग्रामोद्योग विभागाचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता जिल्ह्यातील उद्योजकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व औद्योगिक विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे.दुपारी २ वाजता लक्ष्मीनगर, गोंदिया येथे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक होणार आहे. या बैठकीत स्थानिक विकासाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.सायंकाळी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा विभागाचा आढावा घेण्यात येणार असून, त्यानंतर साहित्यिकांशी संवाद साधला जाणार आहे. उद्योग व साहित्य क्षेत्राशी संबंधित विविध कार्यक्रमांचा समावेश असलेल्या मंत्री सामंत यांच्या या दौऱ्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.