नागपूर :- ‘आवाज महाराष्ट्राचा, नागपूरच्या परिवर्तनाचा’ या अभियानांतर्गत नागपूर शहर युवक काँग्रेसकडून मागील तीन महिन्यांपासून शहरातील विविध प्रभागांमधील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा व आंदोलन करण्यात येत आहे. भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रभागातील विविध प्रश्नांवर आगामी काळात करण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.
नागपूर शहर युवक काँग्रेसचे महासचिव अभिजीत ठाकरे आणि डॉ. मेहुल अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली ही पत्रकार परिषद झाली. यावेळी अभिजीत ठाकरे यांनी सांगितले की, नागरिकांच्या मूलभूत समस्यांसाठी युवक काँग्रेस सातत्याने आवाज उठवत आहे. नागरिकांच्या प्रश्नांवर लढा देतानाच महानगरपालिकेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांकडेही आगामी काळात विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. इतवारी मंगळवारी घास बाजार येथे नियमितपणे डम्पिंग याड तयार केलं होतं. वस्तीतील लोकांना त्याचा अत्यंत त्रास होता ते तिथून हटवण्याचा काम मागील काही दिवसापासून युवक काँग्रेसच्या पाठ पुराव्यामुळे हटविण्यात आले. त्याचप्रमाणे गांधी पुतला संतिचा गणपती अत्यंत प्रसिद्ध असलेला बडकस चौकातील ठिकाणी पावसाळ्याच्या आधीपासून सुरू असलेल्या पाईपलाईनचे काम सुद्धा युवक काँग्रेस तर्फे करण्यात आले. प्रभाग 22 येथे नागनदीच्या साफसफाईचे काम सुद्धा युवक काँग्रेस तर्फे करण्यात आले.
प्रभागनिहाय समस्या समोर आणून त्यावर प्रशासनाकडून तोडगा काढण्यासाठी युवक काँग्रेसच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे डॉ मेहुल अडवाणी यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला अभिजीत ठाकरे, डॉ. मेहुल अडवाणी, अभिषेक वर्धनसिंग, सागर चव्हाण, आयुष गायकवाड, विकी नरेकर, अतुल नाईक आणि आयुष राऊत उपस्थित होते.








