नागपूर :- दिनांक 26 रोजी सरपंच भवन नागपूर येथे महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब राजपात्रित विभागीय संघटनेची आमसभा पार पडली. दीप प्रज्वलन करून आमसभेची सुरुवात करण्यात आली. आमसभेच्या अध्यक्षपदी योगेश दांदळे प्रमुख कार्यवाहक केंद्रीय संघटना मुंबई तर दिनेश चंद्र राजुरकर विभागीय अध्यक्ष अमरावती हे प्रमुख पाहुणे म्हणून आमसभेस उपस्थित होते. सदर आमसभेत मागील आमसभेचे इतिवृत्त वाचन आणि मंजुरी. आर्थिक वर्षाचा जमा खर्च मंजूर करणे, विभागीय कार्यकारणी मधील रिक्त पदे भरणे बाबत कार्यवाही करण्यात आली. तसेंच कोर्ट केस व पदोन्नती बाबत चर्चा करण्यात आली. संघटनेत नवीन आलेले सहाय्यक लेखाधिकारी यांची सभासद नोंदणी करण्यात आली व अध्यक्षांच्या परवानगीने येणारे इतर विषयांवर साधक-बाधक चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय संघरक्षित तर प्रस्तावना विनोद बोरघाटे यांनी केली. मागील वर्षाचा संपूर्ण लेखाजोखा उत्तम गलानी विभागीय अध्यक्ष यांनी सर्वासमोर सादर केला. केंद्रीय संघटनेच्या वाटचालीबाबत विस्तृत विवेचन निलेश बोनगिरवार केंद्रीय समन्वयक यांनी केले. आमसभेस स्वाती दारुणकर केंद्रीय कार्याध्यक्ष तर रवींद्र तायडे अमरावती विभागीय सचिव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आरती राठोड यांनी केले. राज्य गाणानंतर नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता रुपेश गायधने, विजय गाठे, संजय बुलबुले, प्रवीण रीनके, सचिन आईलवार, मनीषा हटवार, संजय पोलके, राजेश बेलोरकर, शुभांगी रामटेके, इत्यादी उपस्थित होते.
सरपंच भवन नागपूर येथे महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब राजपात्रित विभागीय संघटनेची आमसभा संपन्न









