spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मुलुखमैदानी तोफ प्रकाश कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प मध्यवर्ती बसस्थानकाला डाॅ. आंबेडकर नाव द्यावेत – बागडे

नागपूर :- गणेश पेठ मध्यवर्ती बसस्थानक परिसराचा आजुबाजूला आंबेडकरी समाजाचा बालेकिल्ल्ला आहेत उदा. रामबाग, इमामवाडा, उंटखाना, मॅडल मिल्स चाल इत्यादी वस्ता आहेत इतकेच नव्हे तर बसस्थानकावर ऑटोचालक ई रिक्षाचालक, कामगार, फूटपाथवर दुकानदाराची व्यवसायाची चाल आहे ईथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, धम्मचकॢ परिवर्तन कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होत असतात त्यामुळे इथल्या नागरिकांकडून वारंवार हि मागणी उठत असते त्यांचा भावनेचा आदर म्हणून गणेश पेठ मध्यवर्ती बसस्थानकाला भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावेत. अशी मागणी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केली. ते आंबेडकरी चळवळीतील मुलुखमैदानी तोफ प्रकाश कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार करतांना प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. प्रथम डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रावर धम्म सेनेचे नेते रवीभाऊ शेंडे यांनी पुष्पहार अर्पण केले तर धर्माजी बागडे यांनी दीपप्रज्वलन केले सचिन नगराळे, प्रा. रमेश दुपारे, धनराज बागडे, जयदेव चिंवडे. हंसराज उरकुडे. राजु कांबळे, अमर भाऊ, यांनी सत्कार मुर्ती यांच्या शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला कार्यक्रमाचे आयोजन प्रज्योत कांबळे आणि मित्रमंडळी यांनी केला याप्रसंगी बसस्थानक परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Popular Articles