– वाइल्ड ॲनिमल अँड नेचर बहुउद्देशीय संस्थेच्या सर्पमित्रांनी दाखवली तत्परता; वनविभागा च्या टीटीसी कडे केले सुपूुर्द
कन्हान :- शहरातील एम.जी. नगर परिसरात वीजेच्या तारेचा करंट लागुन जख्मी झालेल्या मोठ्या आकाराच्या घार (ब्लँक कॉईट) पक्ष्याला वाइल्ड ॲनिमल अँड नेचर बहुउद्देशीय संस्था कन्हानच्या सदस्यांनी तत्परतेने रेस्क्यु करून जीवदान दिले.
सोमवार (दि.२४) ऑगस्ट २०२६ ला सकाळी सुमारे ९ वाजता सुमारास एम.जी. नगर येथे मयुर माथुरे यांच्या घरासमोर वीजेच्या तारेचा करंट लागल्याने एक घार पक्षी जख्मी अवस्थेत आढळुन आला. याची माहिती तात्काळ मयुर माथुरे यांनी वाइल्ड ॲनिमल अँड नेचर बहुउद्देशीय संस्था कन्हानचे सदस्य मंगेश मानकर व राजकुमार बावने यांना दिली. माहिती मिळताच संस्थेचे सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आवश्यक खबरदारी घेत जख्मी घारीला सुरक्षित व यशस्विपणे रेस्क्यु केले. त्यानंतर उपचारासाठी सदर पक्षी वनविभागाच्या टीटीसी सेंटर कडे सुपुर्द करण्यात आले. जख्मी घारीवर आवश्यक उपचार करून त्याला पूर्णपणे बरे झाल्यानंतर पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात येणार आहे.
वन्यजीवांच्या संरक्षणासाठी वाइल्ड ॲनिमल अँड नेचर बहुउद्देशीय संस्था कन्हानचे सदस्य २४ तास , ७ दिवस सेवा देण्यासाठी तत्पर असुन संकटात साप डलेल्या वन्यजीवांना मदत करण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातुन सातत्याने केले जात आहे.








