spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शाळेत प्रवेशोत्सव दिवस ; आयुष्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात..

 

सचिन चौरसिया, प्रतिनिधी

चिमुकल्यांना बग्गीमध्ये बसवुन आनंद झाला द्विगुणित

रामटेक 27 :- शाळा….या दोन अक्षरी शब्दात किती मोठं विश्व सामावलंय, शाळेचा पहिला दिवस, कुणी पहिल्यांदाच या नवीन विश्वात आज प्रवेश करेल तर कुणी मोठ्या सु्ट्टीनंतर आज पुन्हा शाळेत जाईल. शहरातील ख्यातनाम तथा विविध उपक्रमशिल उपक्रमांमध्ये शासनाकडून लाखो रुपयांचे पुरस्कार मिळालेल्या समर्थ प्राथमिक शाळेच्या पहिल्याच दिवशी सुरुवात प्रवेशित विद्यार्थ्यांना पुष्प, पुष्पगुच्छ देत त्यांना घोडागाडी ( बग्गी ) मध्ये बसवुन प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. दरम्यान याच दिवशी चिमुकल्यांना शाळेच्या शिस्तप्रिय मुख्याध्यापिका कविता संदीप जंजाळ तथा शिक्षक, शिक्षीकांच्या हस्ते मोफत पाठयपुस्तके, कंपास बॉक्स, सोनपापडी देत चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला. त्याचप्रमाणे नवीन प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांसह बालवाडीच्या विद्यार्थ्यांना घोडागाडी (बग्गी) मध्ये बसवुन त्यांची फेरी काढण्यात आली. नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी मुख्याध्यापिका  कविता संदीप जंजाळ यांचेसह सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Popular Articles